शालेय पोषण आहारात फोर्टीफाईड तांदूळ?

सुनसगावच्या पालकांमध्ये संभ्रम
शालेय पोषण आहारात फोर्टीफाईड तांदूळ?

सुनसगाव,(Sunasgaon) ता. भुसावळ (वार्ताहर) -

येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या (Z. P. Marathi School) शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना तांदूळ (Rise) वाटप करण्यात आला होता.

मात्र घरी मुलांसाठी खिचडी बनविण्यासाठी तांदूळ पाण्यात टाकले असता तांदूळ पाण्यावर तरंगतांना दिसले असता प्लास्टिक व फायबर (Plastic & Fiber) मिश्रीत तांदूळ टाकून विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळत असल्याचा आरोप करत पालकांनी संताप (Parrent Angry) व्यक्त केला
काही पालकांनी हा प्रकार येथील ‘देशदूत’ (Deshdoot) कडे सांगीतला असता याबाबत जि.प. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना पाटील (Head Master Vandana Patil) यांना सांगीतला असता. त्यांनी शालेय पोषण आहार संबंधी दि ४ ऑगष्ट २०२१ चे पत्र दाखविले या पत्रात शासनाने उल्लेख केला आहे की, विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळावा यासाठी शालेय पोषण आहाराच्या तांदूळामध्ये फोर्टीफाईड तांदूळाचे मिश्रण करण्यात आले असून त्याचे प्रमाण एका किलो मागे १० ग्रॅम आहे व हा फोर्टीफाईड तांदूळ रंगाने पिवळसर असून वजनाने हलका आहे.

त्यामुळे हा तांदूळ पाण्यावर तरंगतो असे सांगीतले. नेमका असाच प्रकार पालकांना अनुभवायला आला आहे त्यामुळे पालक संभ्रमात पडले आहे. मात्र ‘देशदूत’ ने वेळीच लक्ष दिल्याने पालक व शाळा व्यवस्थापन यांच्यात होणारा वाद टळला आहे.

Related Stories

No stories found.