माजी अभियंता गिरगावकरांचा अहवाल मनपाकडून शासनाकडे

jalgaon municipal corporation
jalgaon municipal corporation

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

महापालिकेचे (Municipal Corporation) माजी शहर अभियंता (Former City Engineer) एम.जी.गिरगावकर यांच्या विरूध्द नगरसेवकांनी (corporators) तक्रारी (Complaints) केल्या होत्या. त्याबाबत कारवाईचा (Action decision) निर्णय घ्यावा असा अहवाल महापालिकेतर्फे राज्याच्या पाणी पुरवठा विभागाकडे (Complaints) पाठविण्यात आला आहे.

तत्कालीन शहर अभियंता एम.जी.गिरगावकर यांनी महापालिकेच्या नगरसेवकांना कोणतीही माहिती न देता, महासभेची परवानगी न घेता अमृत योजनेचे सल्लागारपदी एका संस्थेची नियुक्ती केली होती, याबाबत त्यांच्यावर कारवाई करावी अशी तक्रार उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आयुक्ताकडे लेखी केली होती.

भाजपचे नगरसेवक कैलास सोनवणे यांनीही गिरगावकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे, त्या तक्रारींची दखल घेवून आयुक्तांनी शासनाच्या पाणी पुरवठा विभागाला अहवाल दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com