जिल्हा बॅकेच्या माजी अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसे यांच्या वाहनावर हल्ला

जिल्हा बॅकेच्या माजी अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसे यांच्या वाहनावर हल्ला

मुक्ताईनगर Muktainagar प्रतिनिधी

जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा (Former Chairman of District Bank) व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या अ‍ॅड. रोहिणीताई खडसे- खेवलकर (Add. Rohinitai Khadse- Khewalkar) यांच्या वाहनावर (vehicle) आज सोमवारी 27 रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी हल्ल्ला (Attack by unknown) केला. सुदैवाने या हल्लयात कोणसही दुखापत झाली नाही. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत हल्लेखोर पळून (assailants fled) गेलेत. या प्रकारामुळे मुक्ताईनगरात तणावाचे वातावरण (atmosphere of tension) निर्माण झाले आहे.

रोहिणी खडसे
रोहिणी खडसे

अ‍ॅड.रोहिणी खडसे- खेवलकर या चांगदेव येथून हळदीचा कार्यक्रम आटोपून कोथळी येथील त्यांच्या घरी परतत होत्या. त्याचवेळी मुक्ताईनगर सूतगिरणी जवळ अज्ञात इसमांनी समोर येत त्यांच्या वाहनावर हल्ला केला. या दगडफेकीत त्यांची फॉर्च्युनर कार (एम एच 19 सीसी 1919) याचा पुढील बाजूने काच फुटला आहे.

दगडफेक झाली त्यावेळी त्यांच्या कारमध्ये त्या स्वतः होत्या, अशी माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. दरम्यान, याबाबत पोलिस अधिक माहिती घेत असून हल्लेखोरांचा शोध सुरू केला असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, या घटनेमुळे अँड. रोहिणी खडसे या प्रचंड घाबरलेल्या असून कार्यकर्ते त्यांच्या मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले असून पोलिसनी तपास सुरू केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com