
जळगाव : jalgaon
पिंप्राळ्यात साकारण्यात येत असलेल्या शिवस्मारकाचे लोकार्पण 10 सप्टेंबर रोजी होत असून त्यासाठी शिवसेना प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जळगावात येणार आहे. त्यांचा दौरा निश्चित झालेला आहे.
या दौर्याच्या नियोजनासाठी संपर्क प्रमुख संजय सावंत जळगावात दाखल झालेले आहेत. त्यांनी शिवस्मारकाला भेट देऊन कामाची पाहणी केली. दरम्यान, याच दौर्यात विधानसभेचीही चाचपणी होणार आहे. पिंप्राळ्यातील मुख्य चौकात शिवस्मारक उभारले जात आहे. त्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.
अश्वरुढ पुतळा धुळ्याहून तयार करुन आणण्यात आला आहे. पुतळ्याची परवानगी व प्रवेश नाट्य चांगलेच चर्चेत राहिले. दोन दिवसापूर्वीच मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनीही शिवस्मारकाला भेट दिली. सध्या कामाला गती देण्यात येत आहे. राजमुद्रा बसविण्यात आली असून पेव्हर ट्रॅक, विद्युत रोषणाई व सुशोभिकरण इतकेच काम बाकी आहे. आठ दिवसात हे काम पूर्ण होईल अशी माहिती उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिली.