पाचोरा पिपल्स बॅंकेचे माजी चेअरमन अशोक संघवी यांचा जामिन अर्ज फेटाळला

मुख्य कार्यकारी अधिकारी नितिन टिल्लु पोलिसांना शरण : पाचोरा पीपल्स बँक भ्रष्टाचार प्रकरण
पाचोरा पिपल्स बॅंकेचे माजी चेअरमन अशोक संघवी यांचा जामिन अर्ज फेटाळला

पाचोरा Pachora (प्रतिनिधी)

दि. पाचोरा पिपल्स को. आॅफ बॅंकेचे (Pachora People's Bank)माजी चेअरमन (Former chairman) अशोक संघवी (Ashok Sanghvi') यांचा जामिन अर्ज (bail application) पाचोरा न्यायालयाने (Pachora court) फेटाळला (rejected) आहे. या प्रकरणातील दुसरे मुख्य आरोपी बँकेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नितिन टिल्लु (Chief Executive Officer Nitin Tillu) हे चेअरमन कायद्याच्या कचाट्यात आल्या नंतर ते देखील तब्बल दोन वर्षांनी पाचोरा पोलिसात स्वतः हुन हजर झाले.या दोन मुख्य आरोपींच्या अटकेमुळे बॅकेच्या कथित अपहार (Alleged embezzlement) प्रकरणाला गती मिळणार आहे.

या प्रकरणी पाचोरा पोलिसांनी अशोक संघवी यांची पोलिस कोठडी न मागता न्यायालयीन कोठडी मागितल्यामुळे पोलिस प्रशासनाच्या या तपास यंञणेवर संशय व्यक्त केला जात आहे. या संपुर्ण प्रकरणाची स्वतंञ यंञणेमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी तक्रारदार संदिप महाजन यांनी व्यक्त केली आहे.

तक्रारदार श्री. महाजन यांनी दावा दाखल केल्यानंतर तब्बल दोन वर्षांनंतर अशोक संघवी यांनी पाचोरा पोलिस स्टेशनला स्वतःहुन २२ रोजी हजर झाल्या नंतर पाचोरा न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तसेच आरोपीतर्फे देण्यात आलेल्या जामिन अर्जावर दि. २४ रोजी सुनावणी झाली असता पाचोरा न्यायालयाने अशोक संघवी यांचा जामिन अर्ज फेटाळून लावला आहे.

यामुळे अशोक संघवी यांची पुढील न्यायालयीन वाटचाल ही अधिक खडतर आणि त्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. तर या प्रकरणातिल दुसरे आरोपी बॅकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितिन टिल्लु यांना अटक करण्यासाठी पाचोरा पोलिस मुंबई दहीसर येथे पोलिस उपनिरिक्षक विकास पाटिल , पोलिस कास्टेबल राहुल बेहरे यांचे पथक गेले असता ते घरी आठळुन आले नाही. माञ पथक पाचोरा पोहचण्या अगोदर नितिन टिल्लु हे पाचोरा पोलिसात हजर झाले. या प्रकरणी आरोपी चेअरमन प्रमाणेच पोलिस नितिन टिल्लु यांची पोलिस कोठडी घेते की न्यायालयिन कोठडी घेते याकडे लक्ष लागले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com