या कारणांसाठी नगरसेवकांनीच मनपा प्रशासनास उभे केले आरोपीच्या पिंजर्‍यात...

या कारणांसाठी नगरसेवकांनीच मनपा प्रशासनास उभे केले आरोपीच्या पिंजर्‍यात...

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरात होत असलेला दूषित पाणी पुरवठा (Contaminated water supply), होत नसलेली साफसफाई, रस्त्यांची निकृष्ठ कामे, (Inferior road works) अमृतची रखडलेली कामे व रस्त्यांच्या कामांचे कार्यादेश दिलेले असतांना देखील मक्तेदारांकडून (monopolist) कामे सुरु होत नसल्यामुळे महासभेत (General Assembly) नगरसेवकांनी(corporators) आक्रमक (aggressive) होत प्रशासनाला (corporation administration) आरोपीच्या पिंजर्‍यात (accused's cage) उभे केले. यावर प्रशासनाकडून प्रलंबित विषय बैठका घेवून मार्गी लावण्यात येतील आश्वासन देण्यात आले.

महापौर जयश्री महाजन (Mayor Jayashree Mahajan) यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मनपाच्या सभागृहात महासभा (General Assembly) पार पडली. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, नगरसचिव सुनिल गोराणे उपस्थित होते.

सभेत माजी महापौर सदाशिव ढेकळे यांनी डी-मार्ट ते ईच्छादेवी चौक रस्त्याच्या दुरुस्ती व अमृतचे नळ कनेक्शन दिले जात नाही, त्यावरुन अधिकार्‍यांना धारेवर धरले होते. तसेच राजेंद्र घुगे पाटील यांनी देखील स्मशानभूमी, डी-मार्ट रोडवरुन संताप व्यक्त केला, नगरसेवक इबा पटेल, विरण खडके, सरिता माळी, अ‍ॅड. दिलीप पोकळे, चेतन सनकत आदी नगरसेवकांनी विविध विषयांवरुन अधिकार्‍यांच्या कामाकाजाविषयी नाराजी (Dissatisfied with the functioning of the authorities) व्यक्त केली. तसेच दूृषित पाण्याच्या (Contaminated water supply), मुद्द्यावरुन नगरसेवका पार्वताबाई भिल, डॉ.चंद्रशेखर पाटील यांच्यासह बहुतांश नगरसेवकांनी अधिकार्‍यांना चांगलेच घेरले होते. दरम्यान, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी तातडीने बैठका घेवून चर्चाकरुन विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करु अशी ग्वाही दिली.

निधी वाटपात दुजाभाव

नगरसेविका कांचन सोनवणे यांनी देखील सभेत अधिकार्‍यांना जाब विचारला असून त्या म्हणाल्या की, आमचा प्रभाग दलित वस्तीचा आहे. तरी देखील आम्हाला विकास कामांना निधी (Funding for development works) दिला जात नाही, आमच्याच प्रभागातील इतर नगरसेवकांना विकास कामांसाठी निधी दिला जातो परंतु आम्हाला निधी दिला जात नाही, असा दुजाभाव का ? केला जात आहे, याचा जाब कांचन सोनवणे यांनी विचारला आहे.

तर रस्ता बंद करण्याचा इशारा

शहरातील सर्व कचरा खोटेनगर, चंदू आण्णा नगर, पवार पार्क मार्गे डंम्पींग ग्राऊडमध्ये वाहून नेला जातो. दररोज या रस्त्यावरुन दिवसभर कचर्‍याची वाहने (Garbage vehicles) वापरत असतात मात्र, तरीही महापालिकेकडून हा रस्ता नवीन तयार केला जात नाही, म्हणून मनपाने सर्वांत आधी हा रस्ता तयार करावा अन्यथा आम्ही रस्ता(road) बंद करुन एकही कचर्‍याचे वाहन या रस्त्याने जाऊ देणार नाही, असा इशारा नगरसेवक डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी दिला आहे. तसेच आम्ही पालकमंत्र्यांचे पाया पडून निधी आणतो मात्र, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे (Procrastination of administration) टेंडर प्रोसेस उशिरा होते आणि परिणामी निधी परत जाण्याची वेळ येते असेही डॉ. पाटील यांनी सांगितले. त्यानंतर दूषित पाणी पुरवठ्यावर 'पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, महापालिका भेजे वैसा" असे म्हणत मनपाच्या यंत्रणेवर टीका देखील त्यांनी केली.

रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट

शहरातील रस्त्यांची नवीन कामे सुरु असून मक्तेदारांकडून काम निकृष्ठ (Inferior work) होत आहे. स्वातंत्र्य चौकापासून नेरी नाकापर्यंतचा रस्त्याचे काम हे अभिषेक पाटील यांनी घेतले असून त्यांच्याकडून सलग काम न करता तुकडे तुकडे करुन काम केले जात आहे. त्यामुळे सदर रस्ता जास्त दिवस टीकणार नाही, प्रशासनाने याकडे लक्ष घालावे, असेही नगरसेवक कैलास सोनवणे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच मनपा कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी समिती गठीत करण्यात आलेली होती. परंतु सदर समितीकडून अद्याप काम सुरु झालेले नाही, ते तात्काळ करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.

अ‍ॅड. पोकळेंकडून खर्च वसूल करा

महासभेत अ‍ॅड. पोकळे यांनी मनपाच्या पॅनलवर अ‍ॅड. मुजुमदार यांची बेकायदेशिरपणे नियुक्त केल्याचा आरोप केला. त्यावरुन नगरसेवक कैलास सोनवणे यांनी अ‍ॅड. पोकळे यांची देखील विधी समिती सभापती पदाची (post of Chairman of the Legislative Committee) मुदत संपुष्ठात आली असून ते तरीही मनपाचे दालन वापरत असल्यामुळे तेथील ए.सी., टेलिफोन व कर्मचार्‍यांचा खर्च अ‍ॅड. पोकळेंकडून वसुल करण्यात यावा, अशी मागणी केली. दरम्यान, महापौर व विरोधी पक्षनेते यांच्या प्रभागातील चेनलिंग फिनिशिंग, पेवर ब्लॉक बसविण्याच्या कामाच्या प्रस्तावावरुन नगरसेवक नितीन लढ्ढा म्हणाले की, शहरातील प्राथमिकता व गरज लक्षात घेऊन कामांना मंजुरी दिली पाहिजे, चेनलिंग फिनिशिंग, नाला संरक्षण भिंत, काँक्रिटीकरणाच्या कामांचा कोणीही आग्रह धरु नये, अशी सुचना देखील त्यांनी केली. तसेच आमदारांना देखील अशाच स्वरुपाची विनंती आपण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporation

वॉटरग्रेसचा मक्ता रद्द करा

महासभेला सुरुवात होण्यापुर्वी नगरसेवक नवनाथ दारकुंडे व कैलास सोनवणे यांनी आपले काही विषय आम्हाला मांडावयाचे असून त्याची परवानगी आम्हाला द्यावी, असे महापौरांना सांगितले. त्यानंतर नगरसेवक कैलास सोनवणे म्हणाले की, शहरातील स्वच्छता व सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता होत नसल्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणात (clean survey) जळगाव मनपाला शुन्य गुण (Zero marks for Jalgaon Municipal Corporation) मिळाले आहेत. त्यामुळे शासनाकडून मनपाला मिळाणार्‍या निधीला ब्रेक लागणार आहे. जर शहरातील साफसफाईसाठी आपण वॉटरग्रेस कंपनीला (Watergrass Company) महिन्याचे 6 लाख रुपये देतो तरी अशी परिस्थिती असेल तर, वॉटरग्रेस कंपनीचा मक्ता रद्द (Makta canceled) करण्यात यावा, अशी मागणी कैलास सोनवणे यांनी केली आहे.

कार्यादेश तरीही काम नाही

मनपाच्या आरोग्य विभागाकडून (Department of Health) समतानगर मधील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता होत नाही, तसेच मनपाकडून ज्या रस्त्यांची डागडुजी केली जात आहे ती व्यवस्थित केली जात नसून पहिल्याच पावसात ते डांबर आणि खडी वाहून जाईल मग त्याचा उपयोग काय? असा प्रश्न नगरसेविका उज्वला बेंडाळे यांनी उपस्थित केला. तसेच काव्यरत्नावली चौकापासून ते रामानंद घाटापर्यंत आणि आस्वाद चौकापासून ते गिरणा टाकीपर्यंतच्या रस्त्यांचे कार्यादेश (Road work orders) दिले असतांना मक्तेदार (Monopolistic) काम सुरु का करीत नाही, असा जाब नगरसेविका बेंडाळे यांनी प्रशासनाला विचारला आहे.

पुलावर पथदिवेच नाही

नगरसेवक नवनाथ दारकुंडे म्हणाले की, शहरातील शिवाजीनगर पुलाचे काम सुरु आहे, परंतु या पुलावर सांडपाण्याच्या निचर्‍याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. पुलावर पथ दिवे (Path lights)बसविण्यात आलेले नाही, पुलावर चढण्यासाठी पादचार्‍यांकरीता जिन्याची व्यवस्था नाही, यासाठी महापालिकेचे काय नियोजन आहे, असा प्रश्न दारकुंडे यांनी उपस्थित केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com