जळगावच्या रस्त्यांसाठी आ.भोळे विधानसभेत गरजले

130 कोटींच्या निधीसह एमआयडीसीसाठी नव्या टाऊनशिपची मागणी
जळगावच्या रस्त्यांसाठी आ.भोळे विधानसभेत गरजले

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील रस्त्यांची कामे (City road works) त्वरित होण्यासाठी व शहराच्या विकासासाठी भरघोस निधी (Huge funds) मिळावा यासाठी जळगाव शहराचे आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे (MLA Rajumama Bhole) हे अधिवेशनाच्या (convention) शेवटच्या दिवशी सभागृहात चांगलेच आक्रमक झाले. यावेळी त्यांनी जळगाव औद्योगिक वसाहतीसाठी (Jalgaon Industrial Estate) नव्याने टाऊनशिप मंजूर करावी अशी मागणीही केली.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात जळगाव जिल्ह्यातील अनेक प्रश्न उपस्थित झाले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजुमामा भोळे यांनी शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेचा प्रश्न मांडत आक्रमक भूमिका घेतली. राज्य विधानसभा पावसाळी अधिवेशनात जळगाव शहराचे आमदार भोळे यांनी जळगाव शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून शहरवासीयांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.

त्यामुळे नागरिकांच्या समस्या सोडविणेसाठी रस्ते विकासासाठी भरघोस निधी द्यावा, तसेच या पूर्वी मागणी केलेल्या एकूण 130 कोटी निधीची मागणी मंजूर करण्यात यावी. मागील काळात मंजूर 100 कोटी निधी पैकी उर्वरित 58 कोटी निधी लवकरात लवकर मिळावा अशी मागणी केली.

त्यावर मंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर देतांना सांगितले की, जळगावच्या रस्ते दुरूस्तीसाठी 58 कोटी रूपयांचा निधी महापालिकेकडून प्रस्ताव आल्यानंतर तात्काळ दिला जाईल. तसेच शहरातील इतर प्रश्नांसाठी मुंबईत बैठक घेण्याची ग्वाही त्यांनी सभागृहात दिली.

व्यवहार्यता तपासून टाऊनशिपचा निर्णय

आमदार राजुमामा भोळे यांनी जळगाव शहरातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा व नवीन उद्योगांना चालना मिळण्यासाठी शहरात नवीन इंडस्ट्रीयल टाऊनशिप करिता मंजुरी द्यावी अशी मागणी केली. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील एमआयडीसीमध्ये अशा प्रकारची अर्बन व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव एमआयडीसीची माहिती घेऊन त्याठिकाणची व्यवहार्यता तपासून टाऊनशिपचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com