सलग चौथ्यांदा गिरणा धरणाची शंभरीकडे वाटचाल

जळगावसह नाशिकमध्ये दमदार पाऊस ; पाच धरणे ओव्हरफ्लोे
सलग चौथ्यांदा गिरणा धरणाची शंभरीकडे वाटचाल

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

नाशिक, जळगाव (Nashik, Jalgaon district) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत सुरू असलेल्या तुफानी पावसाने (torrential rain) जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांपैकी (mill project) गिरणा प्रकल्प ( project Girana) पूर्ण भरण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. गिरणा प्रकल्प पूर्णपणे भरण्याचे सलग चौथे वर्ष असून पाच धरणे (Five dams) ओव्हरफ्लो (overflow) झाली आहेत.

जिल्ह्यातील हतनूर, गिरणा आणि वाघूर या मोठ्या प्रकल्पांसह अन्य लघु, मध्यम प्रकल्पांपैकी मोजकेच प्रकल्प वगळता अन्य प्रकल्पांत सद्यःस्थितीत सरासरी 83.06 टक्के उपयुक्त जलसाठा आहे. जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी गिरणा प्रकल्प सलग चौथ्या वेळेस पूर्ण भरण्याच्या मार्गावर असून, सद्यःस्थितीत 98.20 टक्के जलसाठा आहे. तब्बल बारा वर्षांनंतर 17 सप्टेंबर 2019 ला गिरणा प्रकल्प 100 टक्के भरल्याने प्रथमच पाच हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.

एका दिवसात 30 मिमी पावसाची नोंद

आतापर्यंत 2019, 2020, 2021 अशी सलग तीन वर्षे प्रकल्प पूर्ण भरला आहे. मात्र या वर्षी जुलै महिन्यात नाशिक जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे गिरणा प्रकल्पाने अवघ्या पाच ते सात दिवसांतच 35 टक्क्यावरून तब्बल 92 टक्के जलपातळी गाठली. त्यामुळे 17 जुलैपासून गिरणा प्रकल्पातून विसर्ग केला जात आहे.

गिरणा प्रकल्प पाणलोट क्षेत्रात, तसेच नदी उगप परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासांत प्रकल्प पाणलोट क्षेत्रात 30 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, 18.99 दलघमी पाण्याची आवक झाली आहे. गिरणा नदी पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे गिरणा प्रकल्पात पाण्याची आवक पाहाता प्रकल्पात 98.43 टक्के जलसाठा आहे.

पाच धरणांनी ओलांडली शंभरी

जिल्ह्यातील वाघुर धरणात 79.35 टक्के, हतनुर धरणात 77.65 टक्के पाणीसाठा आहे. हतनुर धरणाचे 24 गेट अडीच मीटरने उघडण्यात आले आहे. तर इतर धरणांमध्ये अभोरा, सुकी, मंगरूळ, तोंडापूर आणि बोरी यामध्ये 100 टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. तसेच मोर धरणात 94.69, अग्नावती 27.89, हिवरा 28.46, बहुळा 58.93, अंजनी 82.08, गुळ 79.59, भोकरबारी 24.48 आणि मन्याड 96.13 टक्के पाणीसाठा आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com