ग.स.सोसायटीच्या 113 वर्षात प्रथमच सत्ताधारी विरोधक एकदम ओके

ग.स.सोसायटी jalgaon
ग.स.सोसायटी jalgaon

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

आशिया खंडात प्रसिद्ध असलेल्या ग.स.सोसायटीची (G.S.Society) वार्षिक सर्वसाधारण सभा (Annual General Meeting) दरवर्षी वादळी झालेली आहे. मात्र, यंदा रविवारी होणार्‍या सभेच्या पूर्वसंध्येला ग.स.सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील (President Uday Patil) यांनी सत्ताधारी आणि विरोधकांची मोट बांधत (Ties between the ruling party and the opposition) सभेच्या पूर्वसंध्येला ग.स.सोसायटीच्या मुख्य प्रशाकीय इमारतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सर्व संचालकांची एकत्रित बैठक (Combined meeting of all directors) घेतली. त्यानंतर सभासदांच्या हितासाठी सत्ताधारी व विरोधी संचालक एकत्र आल्याचे सांगत ग.स.सोसायटीच्या 113 वर्षात विरोधक एकाच व्यासपीठावर मग एकदम ओके असे म्हणत सर्व संचालकांमध्ये हास्याची लकेर उमटली.

ग.स.सोसायटीची वार्षिक सभा रविवार, दि.4 सप्टेंबर रोजी दुपारी 1.30 वाजता नूतन मराठा महाविद्यालयाच्या मल्टीपर्पज हॉलमध्ये होत आहे. ग.स.सोसायटीच्या आतापर्यंत झालेल्या सभा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने वादळी झालेल्या आहेत. मात्र, वादळी सभांचा पायंडा मोडीत काढण्यासाठी या सभेच्या पूर्वसंध्येला ग.स.सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सत्ताधारी सहकार गटाचे संचालक. लोकसहकार गटाचे गटनेता सुनील सूर्यवंशी आणि प्रगती शिक्षक सेना गटाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्यासह तिन्ही गटाचे संचालक शनिवारी एकत्र आले होते.

सत्ताधार्‍यांसह विरोधी गटाचे सर्व संचालकांमध्ये रविवारी होणार्‍या सभेविषयी चर्चा झाली. ग.स.सोसायटीच्या 113 वर्षात प्रथमच सत्ताधारी विरोधक एकाच व्यासपीठावर येऊन सत्ताधारी आणि विरोध एकत्र आल्याची ग.स.सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील यांनी काय जादू केली? असा प्रश्न उपस्थित केला.

त्यावर विरोधी गटाचे रावसाहेब पाटील आणि सुनिल सूर्यवंशी यांनी सभासदांच्या हितासाठी सत्ताधारी आणि विरोधी गट एकत्र येऊन सभासदांचे कल्याण आणि त्यांच्या हितासाठी सर्व संचालक एकत्र आले असल्याचे सांगून सत्ताधार्‍यासोबत विरोधक एकाच व्यासपीठावर मग 50 खोके आणि एकदम ओके अशी डायलाकबाजी सत्ताधार्‍यांसह विरोधकांनी केल्याचे सर्व संचालकांच्या चेहर्‍यावर हास्याची लकेर उमटली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com