
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
विद्यार्थ्यांना राष्ट्राबद्दल प्रेम भावना आणि निकोप समाज निर्मितीचे बाळकडू हे महाविद्यालयाच्या (college) राष्ट्रीय सेवा योजना युनिटमध्ये (National Service Scheme Unit) सहभागी झाल्यावरच मिळते. श्रमसंस्काराच्या अनुभवातूनच या स्वयंसेवकाला त्याच्या उज्वल भविष्याच्या अनेक संधी सहज उपलब्ध होतात. परंतु अलीकडील काळात या स्पर्धेच्या युगामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उज्वल भविष्याच्या संधी चाचपडत असतात. परंतु युवकांनी स्पर्धा परीक्षामध्ये झोकुन अभ्यास करण्यासाठी त्यांना त्यांचे शारीरिक आरोग्य, मानसिक स्वास्थ हे सदृढ ठेवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी झाल्याने बळ मिळते, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या (Poet Bahinabai Choudhary North Maharashtra University) राष्ट्रीय सेवा योजना संचालक (Director of National Service Scheme) विभागाचे जिल्हा समन्वयक डॉ. मनिष करंजे यांनी केले.
लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त आजचा युवक आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग या विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यशाळेचे प्रमुख वक्ते डॉ. मनिष करंजे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राकेश चौधरी हे होते. रासोयो पारोळा विभागाचे समन्वयक डॉ. जगदीश सोनवणे, रासोयो जळगाव विभागाचे समन्वयक डॉ. नितीन बडगुजर, ज्येष्ठ प्रा.डॉ.यशवंत महाजन, रासोयो कार्यक्रम अधिकारी डॉ.निलेश चौधरी, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. भारती गायकवाड, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.अशोक हनवते, गणेश बाविस्कर उपस्थित होते.
सर्व प्रथम बी.एस.डब्ल्यू द्वितीय वर्षातील रिद्धी कापडे या विद्यार्थ्यांनीने राष्ट्रीय सेवा योजनेचे लक्ष्यगीताचे गायन केले. त्यानंतर एम.एस.डब्ल्यू. द्वितीय वर्षातील संजना वानखेडे आणि एम. एस. डब्ल्यू. प्रथम वर्षातील आयशा तडवी यांनी एन. एस. एस. गीताचे गायन केले.
पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथील डॉ.जगदीश सोनवणे यांना नुकतेच भारत सरकार द्वारा सार्वजनिक आरोग्यासाठी अंतर वैयक्तिक हिंसाचार एक अभिनव दृष्टिकोन या संशोधनाचे पेटंट मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार प्रा.डॉ.यशवंत महाजन यांच्या हस्ते करण्यात आला.
तृतीय सत्रात जळगाव विभागाचे समन्वयक डॉ.नितीन बडगुजर यांनी मार्गदर्शन केले.राष्ट्रीय सेवा योजनामध्ये सहभागी झालेला स्वयंसेवकांनी उभय समाजाच्या रचनात्मक व्यवस्थेचा अभ्यास करून समाजाच्या निरंतर चालणार्या विकास प्रक्रियेत निर्माण झालेल्या गरजा, प्रश्न आणि आव्हाने ते समजून घेतले पाहिजे,असे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांनी सांगितलेे. सूत्रसंचालन डॉ. अशोक हनवते यांनी तर आभार डॉ. भारती गायकवाड यांनी मानले. यशस्वीतेसाठी राजकुमार पवार, प्रवीण जोशी, चेतन नारखेडे, यांचे सहकार्य लाभले.