
चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी
चाळीसगावात गेल्या वर्षी ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोंबर २०२१ मध्ये पावसाने हाहाकार माजवला होता. अचानक रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy rain) डोंगरी व तितुर नदीला तब्बल सात महापुर येवून गेले.
पुराचे पाणी शेती, अनेक घरांत व दुकानांमध्ये शिरल्यामुळे चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्याचे जनजीवन विस्कळीत होवून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यावेळेस मंत्र्यापासून ते खासदार, आमदार यांनी पुरग्रस्त भागाचेे दौरे करुन, तात्काळ पंचनामे करुन, आर्थिक मदतीच्या (financial help) मोठ-मोठ्या घोषणा केल्या होत्या. परतू सहा महिन्यानतंर पुरग्रस्तांना शासनाची दमडीही मिळाली आहे. आदिवेशनात तरी पुरग्रस्थांना मदतीची घोषणेबाबत अपेक्षा होती. परंतू ती देखील भंग होतांना दिसत आहे. आता पुरग्रस्त भागाचे दौरे करणारे लोकप्रतिनिधी आर्थिक मदतीसाठी पाठपुरावा करणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. की शासनाची मदत आल्यावर आम्ही पाठपुरावा केल्याच्या फुशारक्या मारणार अशी देखील चर्चा होत आहे.
'' आम्ही सत्य साई संस्थानच्या माद्यामातून वैद्यकिय व जिवानावश्यक वस्तूची मदत पुरग्रस्तांना तातडीने केली. पुरग्रस्त भागात मोठ्या प्राणात हानी झाली होती. शासकिय मदतीसाठी पाठपुरवा करण्याची जबाबदारी त्या त्या भागातील लोकप्रतिनिधीची असून त्यांनी ती प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे ''
डॉ.सुनिल राजपूत, मा.अध्यक्ष सत्यसाई समिती
चाळीसगांव शहरापासून अवघ्या२० ते २२ किमी अंतराच्या परीसरातील गौताळा अभयारण्यातून उगम पावणार्या नद्यांच्या, उगम क्षेत्रावर मागील वर्षी ढगफुटी सदृष्य पाऊस पडल्याने त्याचा परीणाम चाळीसगांव शहरासह शहरापासून जवळच असलेल्या कन्नड घाटातील रस्त्यावर झाला आहे. शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या सातमहापूरामुळे तालुक्यातील नदीकाठावरील रहिवाश्यांचे तसेच व्यापार्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. महापूरामुळे आजही असंख्य कुटूंबांची आणि व्यापार्यांचे सहा महिन्यांनंतरही झालेली हानी भरुन निघालेली नाही. त्यावेळी पुरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि सत्ताधारी पक्षांचे मंत्र्यांनी आले होते. पाहणी दरम्यान नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश काढलेत.
पंचनाम्यानंतर लवकरच शासकिय मदतीचे आश्वासनही देवून नुकसानग्रस्तांचे समाधान करुन वेळ मारुन नेण्यात आली. मात्र ऑगस्ट २०२१ नंतर आज मार्च महिन्यातील अधिवेशन आणि सरकारच्या बजेटमध्येही चाळीसगांव तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लोकप्रतिनिधी आणि सत्ताधार्यांनीही कोणतीही तरतूदच काय? पण साधा विषयही न मांडल्याने सहा महिन्यांनंतरही चाळीसगांव तालुक्यातील नुकसानग्रस्तांना फक्त आशेवर ठेवून पाणी पाजण्याचे काम झाले असल्याची खंत तालुक्यातील जनतेला आहे.
ऑगस्ट २०२१ मध्ये आलेल्या डोंगरी आणि तितूर नद्यांना अचानक येणार्या पुराची कोणतीही सूचना वेळीच न देण्यात आल्याने प्रशासनावर ताशेरे ओढण्यात आलेले होते. मात्र पूराच्या पाण्यात वाहून गेलेले असंख्य संसार तसेच व्यापार्यांच्या मालाची काहीतरी भरपाई शासन देईल, या आशेवर आजही नुकसानग्रस्त असले तरी लोकप्रतिनिधी आणि सत्ताधारी मंडळी देखील नदीला आलेल्या पूराला विसरले आहेत का ? अशी म्हणण्याची वेळ आता चाळीसगांवकरांवर आली आहे. ते कधी मदतीसाठी शासन दरबारी पाठपुरवा करणार ? की मदत आल्यावर आम्हीच पाठपुरवा केल्याचे सांगणार असे असंख्य प्रश्न पुरग्रस्तांनासह तालुक्यातील जनतेला पडलेले आहेत.
'' तालुक्यात आलेल्या पुरग्रस्त भागाची पाहणी करुन, आम्ही तात्काळ पंचनामे केले आहेत, त्यासंबंधीचा अहवाल शासनाला पाठविला आहे. परंतू अद्याप कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत पुरग्रस्तांना आलेली नाही. शासनाकडून आर्थिक मदत प्राप्त झाल्यानतंर त्वरित ती संबंधीतांना देण्यात येेईल ''
अमोल मोेरे, तहसीलदार, चाळीसगाव
महापुराचा मोठा फटका तालुक्यातील अनेक गावाला बसला आहे. काहीची घर वाहून गेली तर अनेक घरांमधून पुराचे पाणी गेल्याने संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. जिल्हा परिषद शाळेची देखील अवस्था भयावह झालेली पाहायला मिळाली. शाळेतील महत्वाचा रेकॉर्ड खराब झाल्याने एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. नदीकाठावर असणार्या खळ्यातील छोटी - मोठी जनावरे वाहून गेल्याने पशुपालक शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नदी किनार्यावरील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी गेल्याने जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले होते. त्यांची भरपाई आजूनही मिळालेली नसल्याने शेतकरी व ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
'' पुरग्रस्तांना तातडीची मदत मिळण्याचे लोकप्रतिनिधीचेे आश्वासन हवेतील होते का?, लोकप्रतिनिधीची शेतकरी व पुरग्रस्तांना तातडीच्या मदतीबाबत उदासिनता दिसून येत आहे. शहरातील नदीपात्रात अतिक्रमणासाठी लोकप्रतिनिधीच जबाबदार आहे, आणि त्यामुळेच शहरात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरले होते ''
प्रा.गौतम निकम, जनआदोलन खान्देश विभाग