चाळीसगावात पुन्हा पुराचे संकट : डोगरी, तितुर नदीची पाण्याची पातळी वाढली

कन्नड व नागद घाटात दरड कोसळली, प्रशासनातर्फे सर्तेकता बाळगण्याचे आवाहन
चाळीसगावात पुन्हा पुराचे संकट : डोगरी, तितुर नदीची पाण्याची पातळी वाढली

मनोहर कांडेकर

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

पाटणादेवी डोंगर परिसरात दि,३१ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे चाळीसगाव परिसरात ढगफुटी सदृश पाऊस पडून शहरातून वाहनार्‍या तितुर व डोगरी नदीला पुर आल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. या संकटाच्या जखमा, ताज्या असतानाच, आता पुन्हा रात्री पासून सुरु असलेल्या सतत धार पावसामुळे डोंगरी व तितुर नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून शहरात बामोशी बाबांच्या दर्गा परिसरात पाणी शिरले आहे. तसेच धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस चालू असून पाण्याची आवक धरणांमध्ये वाढत आहे. चितेगाव आणि उंबर ओहळ धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर निघत आहे. दिवसभर जर जोरदार पाऊस सुरु राहिला तर चाळीसगावात पुन्हा पुर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासनातर्फे नदीकाठाच्या गावांना सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

डोगरी व तितुर नदीलपा नुकताच पुर येवून गेल्याने, शहरासह तालुक्यातील वाघडू, वाकडी, रोकडे, मुंदखेडे, जामडी, कोंगानगर, बाणगाव, जावळे, कोदगाव, हिंगोणे सिम, मजरे आदी परिसरातील गावांना पुर येवून गेला. पुराच्या पाण्यामुळे शहरासह अनेक गावांचा संपर्क तुटला होता. पुरात एक हजारांच्यावर जनावरे, शेती औजारे वाहून गेली आहेत. जवळपास एक हजार घरे व दुकानांचे नुकासान झाले आहे. तसेच दोघांचा मृत्यू झाला होता. तर कन्नड घाटात दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात वाहनाचे नुकसान आले. त्यामुळे अजुनही घाटातील वाहतुक बंद करण्यात आली आहे. तर रात्रीपासून सुरु असलेल्या सतत धार पावसामुळे कन्नड घाटाच्या वाहतुकीस पर्यारी मार्ग असलेल्या नागद घाटात देखील दरड कोसळी आहे. तसेच झाडे देखील मोठ्या प्रमाणात पडलेली आहे.

चाळीसगावात पुन्हा पुराचे संकट : डोगरी, तितुर नदीची पाण्याची पातळी वाढली
आता स्वस्तात करता येणार AC चा प्रवास

पुन्हा पुर येण्याची शक्यता-

चाळीसगाव तालुक्यात रात्रीपासून सतत धार पाऊस सुरु असल्यामुळे तसेच पाटणादेवी डोंगर परिसरात जोरदार पाऊस झाल्याने, डोंगरी व तितुर नदीची पाण्याची पातळी रात्रीतून वाढली असून दोन्ही नद्या दुथडी वाहत आहेत. पाण्याची पातळी वाढल्यामुळेे, शहरातील फर्ची पुल व मेल नदीवरील पुल पाण्याखाली गेले आहेत. धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस चालू असून पाण्याची आवक धरणांमध्ये वाढत आहे. चितेगाव आणि उंबर ओहळ धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर निघत आहे. तर वलठाण धरण ओव्हर फ्लो झाल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. दिवसभरच असाच पाऊस सुरु राहिला तर चाळीसगावात पुन्हा पुराचा संकट घोगावत आहे. प्रशासनातर्फे नदीकाठच्या गावांना सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले.

नागद घाटात दरड कोसळी, तर कन्नड घाटात जोरदार पाऊस-

अतिवृष्टीमुळेे कन्नड ३१ ऑगस्टच्या रात्री मोठ्या प्रमाणात दरड कोसळून चिखल व माती झाली होती. तसेच रस्त्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होत. त्यांचे दुरुस्ती काम अद्याप पूर्ण झालेले नाही, तोच पुन्हा रात्रीपासून सुरु असलेल्या सतत धार पावसामुळे ठिकठिकाणी झाडे व दगड पडलेली आहेत. पाण्याचा जोरदार प्रवाह सुरु आहे. तर नागद घटात ठिकठिकाणी दरड कोसळली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात झाडे देखील पडली असल्याची माहिती मिळाली आहे. कन्नड घाटातील दरड व झाडे बाजूल करण्याचे काम ठेकेदार राज पुन्शी व त्यांची टिम युद्धपातळीवर करीत आहेत.

तालुक्यातील पर्जन्यमान स्थिती-

चाळीसगांव - ३२ मि.मी, बहाळ-२२ मि.मी., मेहुणबारे-५५ मि.मी., हातले - १० मि.मी., तळेगांव - ०६ मि.मी., शिरसगांव-०५ मि.मी., खडकी-१२ मि.मी. पर्जन्यमान -१४२, सरासरी पर्जन्यमान -२०.२८, प्रोग्रेसीव्ह पर्जन्यमान-८४१.०६

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com