जळगाववरुन पुणे, इंदूरसाठी विमानसेवा, अजिंठ्यासाठी हेलिकॉप्टर

मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याशी खा.पाटील यांची सकारात्मक चर्चा
जळगाववरुन पुणे, इंदूरसाठी विमानसेवा, अजिंठ्यासाठी हेलिकॉप्टर

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

पुणे आणि इंदूर सेवा सुरू करणे करण्यासह अजिंठा ते जळगाव हेलिकॉप्टर सेवा, जळगाव विमानतळावर मंजूर असलेल्या हेलिकॉप्टर व विमान पायलट प्रशिक्षण केंद्राला गती त्याचप्रमाणे शेतमाल, नाशवंत व किमती मालाची देशात व देशाबाहेर आयात निर्यात करण्यासाठी कार्गो लॉजिस्टिकची निर्मिती करणे, मोठ्या आकाराची विमाने थांबण्यासाठी धावपट्टीची लांबी वाढवणे या विविध विषयांवर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Minister Jyotiraditya Scindia) यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने लवकरच जळगाव विमानतळावरून पुणे व इंदोर प्रवासी सेवा सुरू होणार असल्याची माहिती खासदार उन्मेश पाटील यांनी आज दिल्ली येथून दिली आहे.

खासदार उन्मेश पाटील (MP Unmesh Patil) यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची त्यांच्या दिल्ली कार्यालयांमध्ये भेट घेतली. यावेळी जळगाव विमानतळाचा चौफेर विकास करण्यासाठी विविध पाच विषयांवर केंद्रीय मंत्र्यांनी खासदार उन्मेश पाटील यांच्याकडून माहिती जाणून घेतली. जळगाव विमानतळ येथे मंजूर झालेले पायलट ट्रेनिंग सेंटर व हेलिक्रॉप्टर ट्रेनिंग सेंटर बाबत कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. जळगाव विमानतळावर रात्री विमान उतरण्याची व्यवस्था कार्यान्वित झाल्याने प्रसंगी मोठ्या आकाराची विमाने जळगाव विमानतळावर उतरण्यासाठी धावपट्टीची लांबी वाढवण्यात यावी.अशी विनंती खासदार उन्मेश पाटील यांनी केली होती. मंत्रीमहोदयांनी यावर तातडीने कार्यवाहीचे संकेत दिले.

जळगाव विमानतळावर वस्तु साठवण्यासाठी व्यवस्था असल्याने कार्गो लॉजिस्टिक सेवा सुरू केल्यास शेतमाल, नाशवंत व किंमती वस्तूंची देशात व देशाबाहेर आयात निर्यात करण्यासाठी येथून सुविधा उपलब्ध व्हावी. यांचा मोठा लाभ स्थानिक उद्योजकांना होईल. तसेच महत्वाचा जळगाव ते पुणे व जळगाव ते इंदोर प्रवासी विमान सेवा सुरू व्हावी यासाठी येत्या दहा दिवसात गती देऊन संबंधित अधिकार्‍यांना केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आदेश दिले.

अजिंठा हेलिकॉप्टर सेवा-

केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी खासदार उन्मेश पाटील यांच्याशी मराठीत संवाद साधत जळगाव हेलीपोर्ट सेवा सुरू करण्यासंदर्भात चर्चा करीत अधिक माहिती जाणून घेतली. आणि ही सेवा सुरू करण्यासाठी मंत्रालय आग्रही आहे. त्यामूळे जळगाव विमानतळ हे लवकरच देशाच्या नकाशावर अजिंठा हेलीपोर्ट सेवेमुळे चर्चेत येईल. अशी भावना खासदार उन्मेश पाटील यांनी दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com