जुन्या अपार्टमेंटमधील फ्लॅटधारकांना मिळणार स्वतंत्र नळसंयोजन

मनपा पदाधिकारी, प्रशासन, मक्तेदारांच्या बैठकीत निर्णय
जुन्या अपार्टमेंटमधील फ्लॅटधारकांना मिळणार स्वतंत्र नळसंयोजन

जळगाव jalgaon

अमृत पाणीपुरवठा योजनेचे (Amrut water supply scheme) काम अंतीम टप्प्यात आहे. अपार्टमेंटधील (apartment) फ्लॅटधारकांना (flatholders) स्वतंत्र नळ संयोजन (Plumbing combination) मिळत नसल्याच्या तक्रारी लोक प्रतिनिधींसह प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार सोमवारी मनपा पदाधिकारी, प्रशासन आणि मक्तेदारांची बैठक घेण्यात आली. दरम्यान, जुन्या अपार्टमेंटधील फ्लॅटधारकांना स्वतंत्र नळ संयोजन देण्याचा निर्णय (Decision) घेण्यात आला आहे.

महापालिकेच्या १७ व्या मजल्यावरील महापौरांच्या दालनात महापौर जयश्री महाजन(Mayor Jayashree Mahajan) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा, कैलास सोनवणे, राजेंद्र घुगेपाटील, विशाल त्रिपाठी, ऍड, शुचिता हाडा, बंटी जोशी, आयुक्त सतिष कुलकर्णी, शहर अभियंता व्ही.ओ.सोनवणी, प्रकल्प अभियंता योगेश बोरोले, पाणीपुरवठा अभियंता गोपाल लुल्हे यांच्यासह मक्तेदाराचे प्रतिनिधी उपस्थित होते.
अमृतअंतर्गत (Amrut water supply scheme) नळ संयोजन (Plumbing combination) उपलब्ध करुन देण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. शिवाय एका इमारतीमागे एक नळ संयोजन असे धोरण निश्‍चित करण्यात आले होते. जुन्या अपार्टमेंटमध्ये टाकी बसविण्यासाठी किंवा पार्किंगची जागा नसल्यामुळे पूर्ण अपार्टमेंट मिळून एकच नळ संयोजन असे धोरण असल्याने शहरातील जुन्या अपार्टमेंटमधील फ्लॅटधारकांनी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाकडे तक्रारी (Complaints) केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेवून जुन्या अपार्टमेंटधील फ्लॅटधारकांना (flatholders) स्वतंत्र नळ संयोजन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अनधिकृत नळ संयोजन देणार्‍या कर्मचार्‍यांवर होणार कारवाई
अमृत अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे नवीन नळ संयोजन देतांना काही ठिकाणी अनधिकृत (Unauthorized) नळ संयोजन देण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे. त्यानुसार संबंधीत नळ संयोजन खंडीत करण्यात येणार आहे. तसेच संबंधीत मनपातील कर्मचार्‍यांना दोषी ठरवून निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय देखील बैठकीत घेण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com