Breaking news : ग.स.वर लोकसहकार,सहकार,प्रगती शिक्षक सेनेचा झेंडा

अंतिम निकाल लागण्यास पहाटेची प्रतिक्षा
Breaking news : ग.स.वर लोकसहकार,सहकार,प्रगती शिक्षक सेनेचा झेंडा

जळगाव : jalgaon

अत्यंत चुरशीच्या झालेल्या ग.स.सोसायटीच्या (Co-operative Credit Bureau of District Government Servants) निवडणूक मतमोजणीची प्रक्रीया (counting process) रात्री उशीरा पर्यत सुरू होती. रात्री 12.30 वाजता बाहेरील मतदार संघाचा निकाल (result) अंतिम टप्प्यात आला होता . त्यात लोकसहकारचे (Lok Sahakar) 5 तर सहकार (Sahakar) गटाचे 4 उमेदवार आणि प्रगती शिक्षक सेना (Pragati Shikshak Sena) गटाचे 2 उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर (threshold of victory) होते.

लोकमान्य, स्वराज्य या पॅनलनचे उमेदवार मात्र पिछाडीवर होते.गसत लोकसहकारने (Lok Sahakar) विजयाकडे जोरदार मुसंडी मारली असुन सत्तेकडे कुच केली आहे. बहुमतासाठी (majority) मॅजीक फिगर (Magic figure) १२ संचालकांची असुन लोकसहकारचे स्थानिक व महिला मतदार संघातील उमेदवार देखील आघाडीवर असल्याने लोकसहकारचा (Lok Sahakar) झेंडा गसवर फडकण्याचीे शक्यता आहे.

दरम्यान अद्याप स्थानिक मतदार संघ,व्हीजेएनटी,अनु.जाती,ओबीसी,महिला गटाची मतमोजणी बाकी असल्याने ग.स.चा निकाल लागण्यास पहाटेची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

ग.स.च्या बाहेरील मतदार संघात विद्यमान ४ संचालकांना पराभवाच्या छायेत आहेत. त्यात सुनिल निंबा पाटील,सुनिल अमृत पाटील,एन.एस.पाटील,विश्वास सुर्यवंशी यांचा समावेश आहे.विजयाकडे कुच करणाऱ्या उमेदवारांमध्ये लोकसहकारचे हरिचंद्र बोंडे,विद्यमान संचालक अनिल कौतिक गायकवाड पाटील,प्रकाश भिका पाटील,शांताराम दाजीबा पाटील,अजयराव आनंदाराव सोमवंशी,विद्यमान संचालक ज्ञानेश्वर रूपचंद सोनवणे,रविंद्र मुकंदराव सोनवणे यांचा समावेश आहे. तर सहकार मधुन भाईदास बाजीराव पाटील,विद्यमान संचालक महेश विठ्ठलराव पाटील,योगेश इंगळे यांचा समावेश आहे.

आशिया खंडातील नाव लौकीक असलेल्या गस सोसायटीसाठी दोन दिवसापुर्वीच झालेल्या मतदानानंतर आज दि.३० रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उमवि विद्यापीठात सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली.यासाठी सर्व उमेदवार व त्यांचे समर्थक पहाटे ७ वाजेपासून विद्यापेठात ठाण मांडून होते. उत्सुकता शिगेला पोहचलेल्या या निवडणूकीची मतमोजणीची सुरूवात सर्वाधिक उमेदवार र्रिंगणात असलेल्या बाहेरील मतदार संघापासून करण्यात आली.रात्री ११ नंतर निकाल घोषीत झाल्यानंतर उमेदवारांसह समर्थकांनी जल्लोष केला.

.....सकाळी ८ वाजता मतपेट्या फोडल्या

गस निवडणुकांची मतमोजणी सुरू करण्यापुर्वी उमेदवारांच्या प्राधिकृत केलेल्या प्रतिनीधींच्या उपस्थितीत मतपेट्या मतमोजणी हॉलमध्ये आणून त्यांच्या समोरच मतपेट्या उघडण्यात आल्या.यासाठी ६९ टेबलवर मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली होती.तसेच प्रत्येक ठीकाणी लोखंडी जाळ्या लावून फक्त प्रतिनिधी व उमेदवारांनाच या ठीकाणी प्रवेश देण्यात येत होता.६९ टेबलवर प्रत्येकी ३ कर्मचारी प्रमाणे व्यवस्था करण्यात आली होती. ७ सहाय्यक निबंधक रो ऑफीसर म्हणून नियंत्रण ठेवून होते.तर मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई हे सर्व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी सुचना देत होते.

.....बाहेरील मतदार संघापासून मतमोजणीला सुरूवात

गस सोसायटीच्या निवडणूकीत सर्वाधिक ११ जागा या बाहेरील मतदार संघातील असल्याने व सर्वाधिक ५६ उमेदवार या गटात असल्याने या मतमोजणीला सर्वात आधी सुरूवात करण्यात आली. सकाळी ८ ते ९ दरम्यान पेट्यांमधील मतपत्रिकेचे शॉर्टींग करण्यात आले.बाद ठरलेली मते बाजुला काढून २५ मतांच्या पत्रिका जोडून शॉर्टींग करण्यात आले.त्यानंतर १०.३० वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली. दुपारी १ वाजेपर्यंत ६ हजार मतांची मोजणी करण्यात आली होती.


....निवडणूक निर्णय अधिकाऱ्याशी वाद

मतमोजणीच्या ठीकाणी येण्यासाठी सहकार विभागाकडून प्रत्येक उमेदवारासह त्यांच्या दोन प्रतिनीधींना ओळखपत्र देण्यात आले होते.मात्र सायंकाळी एक तरूणाने मतमोजणीच्या ठीकाणी जाण्यासाठी हुज्जत घातली.यावेळी पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.


...बुथनिहाय आकडेवारीसाठी आग्रह

बाहेरील मतदार संघाची मतमोजणीे सकाळी १०.३० वाजेपासून सुरू झाली असतांना ४.३० वाजेपर्यत ८० टक्के मतमोजणी झालेली होती.मात्र तरी देखील बुथ निंहाय आकडेवारी उमेदवारांना मिंळत नसल्याने उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे ही आकडेवारी मिळावीे असा आग्रह धरला.

जंबो मतपत्रिकेने फोडला घाम

गस सोसायटीसाठी सर्वाधिक ११ जागा या बाहेरील मतदार संघातून निवडून आले आहे. या मतदार संघात तब्बल ५६ उमेदवार असल्याने तब्बल ५.३० वाजेपर्यंत देखील निकाल लागले नव्हते.यासाठी जंबो मतपत्रिका कारणीभुत असल्याचे सांगण्यात आले. याची छानणी व प्रत्येकाची मतमोजणी करणी करण्यास कर्मचाऱ्यांची चांगलीे दमछाक झाली. मतमोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मतमोजणी करतांना या मतपत्रीकेने घाम फोडला.तर दुसरीकडे मात्र दिवसभरात अनेक वेळ विजेचा लपंडाव त्यात तापमानाचा पारा अधिक यामुळे कर्मचाऱ्यांना हाल सोसावे लागले.

पहाटे पर्यंत मतमोजणी चालणार

रात्री 12.30 वाजेपर्यंत मतमोजणीची प्रक्रीया सुरू होती.सुरूवात करण्यात आलेल्या बाहेरील मतदार संघाचे निकाल देखील जाहिर करण्यात आले नव्हते.फेरीनिहाय प्रशासनाकडून आकडेमाड सुरू होती. मात्र समर्थकांकडून जल्लोष सुरू झाला होता. रात्री उशिराचे वृत्त घेतले असता स्थानिक मतदार संघ व महिला मतदार संघात लोकसहकार व सहकार यांच्यात चुरस सुरू होती.

Related Stories

No stories found.