बलात्काराचा प्रयत्न करणार्‍या नराधमाला पाच वर्षाची शिक्षा

पाच कलामांखाली ठरविले दोषी
बलात्काराचा प्रयत्न करणार्‍या नराधमाला पाच वर्षाची शिक्षा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

अल्पवयीन मुलगी (Minor girl) शाळेतील स्वच्छतागृहात गेली असता, येथे त्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न (attempted rape) करणार्‍या विशाल उर्फ डिगंबर अशोक जाधव (Digambar Ashok Jadhav) उर्फ कोळी (वय-20,रा.दहिवद, ता.चाळीसगाव) याला पाच कलामांमध्ये दोषी ठरवित (convicting) त्याला अतिरिक्त जिल्हा सत्र तथा विशेष पोक्सो न्यायाधीश बी.एस.महाजन (Additional District Sessions and Special POCSO Judge B.S .Mahajan) याच्या न्यायालयाने (Court) 5 वर्ष सश्रम कारावास (rigorous imprisonment) व पंधरा हजार रुपये (Fifteen thousand rupees) दंडाची शिक्षा (Punishment of fine)सुनावली.

बलात्काराचा प्रयत्न करणार्‍या नराधमाला पाच वर्षाची शिक्षा
वाहेगुरु दा खालसा वाहेगुरु दी फतेह

पीडित अल्पवयीन मुलगी दि. 16 फेब्रुवारी 2016 दुपारी तीन वाजेच्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील एका शाळेत असताना इतर मैत्रीणींसोबत लघुशंकेसाठी मुतारीत गेली होती. याठिकाणी संशयित विशाल जाधव याने दोन मुलींना पकडून त्यांची छेडखानी केली. त्यातील मुलीने त्याचा हाताला चावा घेवून तीने आपली सुटका करुन घेतली. तर दुसर्‍या मुलीवर आरोपीने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

मात्र तीने देखील आपली सुटका करुन घेत तेथून पळून गेली. दरम्यान पळून गेलेल्या मुलीने हा प्रकार शाळेतील शिक्षकांना सांगून त्यांना घटनास्थळी घेवून आली तेव्हा पीडितेची सुटका झाली होती. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात कलम 354, 376 सह 511 तसेच पोक्सोचे कलम 8 व 12 नुसार गुन्हा दाखल झाला होता.

बलात्काराचा प्रयत्न करणार्‍या नराधमाला पाच वर्षाची शिक्षा
Visual Story # क्रितीचा ‘ठुमकेश्वरी’ अंदाज पाहिलात का?

पीडीतेसह शिक्षकांची साक्ष ठरली महत्वपुर्ण

गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाधिकारी जे.आर.सातव यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला अतिरिक्त जिल्हा सत्र तथा विशेष पोक्सो न्यायाधीश बी.एस.महाजन यांच्या न्यायालयात चालला. विशेष सरकारी वकिल चारुलता बोरसे यांनी करुन 11 साक्षीदार तपासले. यात पीडिता, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच शिक्षक यांच्या साक्षी महत्वपुर्ण ठरल्या.

बलात्काराचा प्रयत्न करणार्‍या नराधमाला पाच वर्षाची शिक्षा
प्रकल्पग्रस्तांना प्रशिक्षण घेता-घेता केले सेवानिवृत्त

प्रभावी युक्तीवादासह पुराव्यांवरुन धरले दोषी

न्यायालयात अ‍ॅड. चारुलता बोरसे यांनी प्रभावी युक्तीवाद केला. तसेच न्यायालयासमोर आलेले पुराव्यांवरुन विशाल जाधव याला पाच कलमांमध्ये दोषी धरण्यात आले. बचावपक्षातर्फे अ‍ॅड.संदीप पाटील यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी विजय पाटील यांनी सहकार्य केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com