पाच वर्षांनंतर खुनाच्याच दिवशी आरोपीला शिक्षा

सक्तमजुरी : गणेशविसर्जनाच्या दिवशी झाला होता युवकाचा खुन
शिक्षा
शिक्षा

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

पाच वर्षांपूर्वी शहरात गणेश विसर्जन मिरवणूकीतील (Ganesh immersion procession) किरकोळ वादातून (minor dispute) 5 सप्टेंबर 2017 रोजी विक्की उर्फ ललीत हरी मराठ युवकाच्या (murder of the youth) खुनातील आरोपी (accused) गोलू उर्फ राजेंद्र उर्फ सुभाष सावकारे याला न्यायालयाने (Court) तब्बल पाच वर्षांनंतर (After almost five years) 5 सप्टेंबर 2022 रोजी 7 वर्षे सक्त मजुरीची (Sentenced to 7 years of hard labour) शिक्षा भुसावळ न्यायालयाने (Bhusawal Court) सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 5 सप्टेंबर 2017 रोजी गणेश विसर्जन मिरवणूकीत आरोपी गोलू उर्फ राजेंद्र उर्फ सुभाष सावकारे याचा विक्की उर्फ ललीत हरी मराठे याच्या सोबत किरकोळ वाद झाला होता. या वादातून गोली याने ललीत याच्या छातीत डाव्या बाजुला धारदार चाकुने वार करुन ठार केले होते. याबाबत धिरज मराठे याच्या फिर्यादीनुसार बाजरपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी सरकार पक्षातर्फे 11 साक्षीदार तपासण्यात आले. यात फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी यांची साक्ष महत्वाची ठरली. सरकारतर्फे सहा. सरकारी अभियोक्ता प्रविण भोंबे यांचा युक्तिवाद ऐकून जिल्हा व सत्र न्या. आर. एम. जाधव, यांनी आरोपीला भा.दं.वि. 304-2 अंतर्गत गुन्हा शाबीत झाला असून आरोपी गोलू सावकारे यांला 7 वर्षे सक्त मजुरी व 10 हजार रुपयांचा दंड व दंड न भल्यास 1 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली.

या खटल्यात फिर्यादीतर्फे प्रफुल्ल पाटील यांनी काम पाहिले. तसेच सहा. सरकारी अभियोक्ता प्रवीण भोंबे यांना पैरवी अधिकारी सहा. फौजदार धनसिंग राठोड व सहा, फौजदार शे. रफीक शे कालू यांनी मदत केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com