चोरीची उकल, पाच लाखांचा मुद्देमाल केला परत

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्ह्याचा यशस्वी तपास
चोरीची उकल, पाच लाखांचा मुद्देमाल केला परत

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी-

तालुक्यातील तळेगाव येथे एकाच्या बंद घराचे कडीकोंयडा तोडून अज्ञात चोरट्यांने कपाटातील ४ लाख २५ हजार रुपये रोख व सोन्या-चॉंदीचे दागिने असा एकूण ५ लाख २८ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या गुन्ह्याचा यशस्वी तपास करुन, मुद्देमाल हस्तगस्त केला आणि न्यायालयाचे आदेशाने ४ लाख २०० रुपयांचा मुद्देमाल संबंधीतांना देण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तळेगाव येथील संतोष सुधाकर राठोड हे दि,२३/२/२०२२ रोजी कामानिमित्ताने घर बंद करुन बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत, दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गच्चीच्या जिन्यावरुन आता प्रवेश केला व दोन्ही बेडरुमचा कडीकोयंडा तोडून कपाट ठेवलेली रोख रक्कम ४ लाख २५ हजार रुपये व सोन्या-चॉंदीचे दागिने असा एकूण ५ लाख २८ हजार रुपयांच्या मुद्देमालावर हात साफ करुन, पसार झाला. संतोष राठोड यांना चोरी झाल्याचे कळल्यानतंर त्यांनी पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला संतोष राठोड यांच्या फिर्यांदीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हातील आरोपीचा काहीएक मागमूस नसतांना पोहेकॉ. युवराज बंडू नाईक, पोना.नितीन किसन आमोदकर, गोवर्धन राजेंद्र बोरसे, शांताराम सिताराम पवार आदिच्या पथकाने गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी अशोक चुन्नीलाल चव्हाण रा.कृष्णनगर तांडा, संदिप उर्फ सॅन्डी भिमसिंग चव्हाण ह.मु.भिवंडी आशांना ताब्यात घेतले.

त्यंाची पोलीस कस्टडी रिमांड मिळवून त्यांच्या ताब्यातून १ लाख ६२ हजार ५०० रुपये रोख व २ लाख ३७ हजार ७०० रुपयांचेे सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ४ लाख २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला, विशेष म्हणजे गुन्हा घडल्यानतंर तीन दिवसातच चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हांची उकल केली. तसेच न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादीस ४ लाख २०० रुपयांचा मुद्देमाल परत केला. ही कावाई पो.अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे, अपर पो.अधीक्ष रमेश चोपडे, पो.नि.संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या पथकाने केली आहे.

Related Stories

No stories found.