आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्याच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत

आ.मंगेश चव्हाण यांच्या तीन महिन्यांच्या मानधातून आर्थिक मदत
आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्याच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी MPSC) परिक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी नसल्याच्या तणावातुन व आर्थिक परिस्थितीमुळे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पुण्यातील स्वप्नील सुनील लोणकर (Swapnil Sunil Lonakar)यांच्या कुटुंबियांवर एका पतसंस्थेचे असलेले १९.९५ लाखांचे संपूर्ण कर्ज भारतीय जनता पक्षाच्या वतीने फेडण्यात आले. यासाठी चाळीसगाव मतदारसंघाचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण (MLA Mangesh Chavan) यांनी आपल्या तीन महिन्यांच्या मानधनातून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Former Chief Minister Devendra Fadnavis), माजीमंत्री आ.गिरीश महाजन (MLA Girish Mahajan) यांच्याहस्ते व विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या पुढाकाराने लोणकर कुटुंबियांना १९.९५ लाखांचा धनादेश दि.२२ जुलै रोजी सुपूर्द करण्यात आला. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, शहर सरचिटणीस अमोल नानकर, जितेंद्र वाघ आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील व परिस्थितीचे चटके सोसलेला तरुण आमदार या नात्याने सामाजिक दायित्व व कर्तव्य म्हणून पुण्यातील स्वप्नील सुनील लोणकर यांच्या कुटुंबियांना मदत केली. यामाध्यमातून राज्यातील हजारो स्वप्नील यांना संदेश द्यायचा आहे की, आत्महत्यासारखे टोकाचे पाउल हा काही पर्याय नाही होऊ शकत, आपल्यामागे कुटुंबियांची होणारी अवस्था, समाजात जाणारा संदेश हे सर्व चित्र खूप विदारक आहे. संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व, सर्व पक्ष, आमदार - खासदार एमपीएससी च्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत, माझी सर्वाना विनंती आहे की, काही अडचण असल्यास आम्हाला सांगा मात्र टोकाचा निर्णय घेऊ नका. ते पुढे म्हणाले की, या आत्महत्येला सरकारचा कारभार जबाबदार आहे अशी भावना युवा वर्ग व्यक्त करु लागली आहे. स्वप्नील सारख्या एमपीएससी केलेल्या आणि करु इच्छिणार्‍या शेकडो युवकांना न्याय द्यावा अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. चझडउ चा अभ्यास करणारी मुलं रिकामटेकडे म्हणून पुस्तकं घेऊन बसलेली नसतात. भविष्यातले होणारे देशाचे प्रशासक असतात. एखादा पेपर सोडवला आणि पोस्ट मिळाली म्हणजे चझडउ नसते. त्यासाठी अनेक शानशौकींना त्यांनी मुरड घातलेली असते. रात्रीचा दिवस करुन केलेले असते. एमपीएससीची परिक्षा पास होऊन अधिकारी म्हणून पदभार स्विकारेपर्यंतचा पल्ला खूप मोठा- लांबलचक असतो. पूर्व व मुख्य परिक्षा पास होऊन ३-३ वर्षे मुलाखत होत नसेल, नोक-या मिळत नसतील, तर पोरं जीव देतील नायतर काय ? सरकारला फक्त स्वत:च्या खुर्च्या शाबूत ठेवणे आणि खिसे भरणे हेच महत्वाचं वाटत आहे असं दिसतंय. मुख्यमंत्री, मंत्री आणि सत्ताधारी नेत्यांनी त्यांच्या मिसरूड न फुटलेल्या पोरांना मंत्री आमदार करून त्यांची भविष्य सेट करून ठेवलीत, पण गोरगरिबांच्या पोरांनी करायचं काय? ना शिक्षणात, ना नोकर्‍यात आरक्षण, काही विभागात तर जागा नाहीत, नोकर भरती निघत नाहीत, सरकारच्या नाकर्तेपणापायी पोरांनी जीव द्यायचे का? आज स्वप्निल लोणकर या एमपीएससी पास झालेल्या तरुणाने नेमणुक आणि नोकरी अभावी जीव दिला, याचे पडसाद संपुर्ण महाराष्ट्रभर उमटल्याशिवाय राहणार नाहीत असेही त्यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com