Breaking News महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या लॉकरमधून पाच किलो सोने लांबविले

बँक कर्मचाऱ्यासह तीन आरोपी गजाआड, पोलीसांची यशस्वी कामगिरी
Breaking News महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या लॉकरमधून पाच किलो सोने लांबविले

भडगाव - bhadgaon

तालुक्यातील आमडदे येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत लॉकर मधून अंदाजे सुभारे साडेतीन कोटी रूपयाचे 5 कीलो सोन्याची चोरी झाल्याची घटना आज दि.२२ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

Breaking News महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या लॉकरमधून पाच किलो सोने लांबविले
हार्दिक पांड्या उंची घड्याळांचा शौकिन, पाहा त्याच्याकडचे कलेक्शन

बँकेत असलेल्या लॉकरचे कुलूप उघडून त्यात असलेले सुमारे पाच किलो सोने चोरीची घटना घडली ते सोने सुमारे साडेतीन कोटी रूपये किंमतीचे असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत बँक कर्मचाऱ्यासह तीन आरोपींना अत्यंत शिताफीने पोलीस विभागाने ताब्यात घेतले असून गायब झालेला मुद्देमालही हस्तगत केला आहे. या सर्व प्रकारात बँक कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचे समजते.

बँकेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून त्याचे डीव्हीआर हे चोरी करणाऱ्या संशयीतांनी एका विहीरीत फेकून दिले. तर चोरलेले सोने एका शेतात लपवून ठेवले होते.

घटनास्थळी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.प्रविण मुंडे, चाळीसगाव विभागाचे डीवायएसपी श्री.गावंडे, एलसीबीचे पी.आय.श्री.बकाले, भडगाव पी.आय.अशोक उतेकर यांनी तत्काळ भेट देवून पाहणी केली व मातहिती घेत तपासाला गती दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com