चोपडा महसूल मंडळात पाचशे हेक्टर वरील केळी बागा जमीन दोस्त

 चोपडा महसूल मंडळात पाचशे हेक्टर वरील केळी बागा जमीन दोस्त

चोपडा Chopda ( प्रतिनिधी )
चोपडा तालुक्यात दि.९ जून रोजी गुरुवारी रात्री १० वाजेनंतर आलेल्या वादळी वाऱ्यामुळे (Due to strong winds) चोपडा, गोरगावले बु! अडावद,धानोरा अशा पाच महसूल मंडळातील १७ गावांमधील ७९२ केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पाचशे हेक्टर (Five hundred hectare) क्षेत्रावरील केळी बागा (banana orchards) जमीनदोस्त (Damage) झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सर्वात जास्त नुकसान गोरगावले बु! महसूल मंडळात झालेले आहे.अर्धा तास चाललेल्या वादळात होत्याचे नव्हते झाले .काल झालेल्या वादळामुळे केळी उत्पादक शेतकरी उध्वस्त (Banana growers devastated) झाला आहे.दरवर्षी येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला असून, नेहमी येणाऱ्या संकटांना कसे तोड द्यायचे असा प्रश्न शेतकऱ्यां पुढे आहे.नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे (Punchnama) होऊन शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

चोपडा तालुक्यात दि.९ जून रोजी गुरुवारी रात्री ९ वाजता आकाशात ढगांची जमावा जमव होऊन विजांचा प्रचंड गडगडाट होऊन रात्री १० वाजेनंतर जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने तुरळक हजेरी लावली. वादळामुळे चोपडा, गोरगावले बु!,अडावद,धानोरा या चार महसूल मंडळातील गावांमध्ये पाचशे एकर क्षेत्रावरील केळी बागा जमीनदोस्त झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

शेतकऱ्यांच्या नुकसानी बाबत तक्रारी आल्याने तहसीलदार अनिल गावित यांच्या आदेशाने आज शुक्रवारी संबधित मंडळ अधिकारी,तलाठी कर्मचारी यांनी चोपडा, गोरगावले बु!,अडावद,धानोरा महसूल मंडळात (Revenue Board) नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.पाहणीत प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ५००.७५ हेक्टर क्षेत्रावरील केळी बागांचे नुकसान झाले आहे.सर्वात जास्त नुकसान गोरगावले बु! महसूल मंडळात झालेले आहे.

अर्ध्या तासाच्या वादळात (storm) होत्याचे नव्हते झाले.वादळात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आर्थिक फटका बसला आहे.आधीच संकटात सापडलेला शेतकऱ्यांपुढे वादळाचे संकट म्हणजे दुष्काळात तेरावा महिनाच म्हणावा लागेल.शेतकऱ्याने किती संकटे सहन करायची हा गंभीर प्रश्न त्याच्यापुढे उभा आहे.

केळी बागांचे तात्काळ पंचनामे (Punchnama) होऊन शासनाकडून आर्थिक मदत मिळावी.तसेच पिक विमा कंपन्या अशा प्रकाराकडे शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे दुर्लक्ष करून आर्थिक नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करतात असा आज पर्यंतचा अनुभव आहे.म्हणून शासनाने केळी पिक विमा कंपन्यांना (Banana crop insurance companies) योग्य ते आदेश द्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

* महसूल मंडळ निहाय झालेले नुकसान *

१) चोपडा महसूल मंडळात : तीन शेतकऱ्यांचे ३.७५ हेक्टर क्षेत्रात केळीचे नुकसान झाले आहे.

२) धानोरा महसूल मंडळात पिंप्री येथील २४ शेतकऱ्यांचे १६ हेक्टरवरील केळीचे नुकसान झाले आहे.

३) गोरगावले बु! महसूल मंडळात गोरगावले बु! येथील २३८ शेतकऱ्यांचे १८५ हेक्टर क्षेत्रात केळी बागांचे नुकसान झाले आहे.वडगावसीम येथे १२८ शेतकऱ्यांचे ०७४ हेक्टर क्षेत्रात केळीचे नुकसान झाले आहे.धनवाडी येथे १८ शेतकऱ्यांचे २३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

कोळंबा येथे ४२ शेतकऱ्यांचे २२हेक्टर क्षेत्रात केळीचे नुकसान झाले आहे.कठोरा येथे ८८ शेतकऱ्यांचे ३७ हेक्टर क्षेत्रात केळीचे तर ७ शेतकऱ्यांचे ०५ हेक्टर क्षेत्रात पपईचे नुकसान झाले आहे.खडगाव येथे १२ शेतकऱ्यांचे २७ हेक्टर क्षेत्रात केळीचे नुकसान झाले आहे.गोरगावले खु! येथे ४२ शेतकऱ्यांचे २३ हेक्टर क्षेत्रात केळीचे नुकसान झाले आहे.वडगाव खु! येथे १२ शेतकऱ्यांचे ०३ हेक्टर क्षेत्रात केळीचे नुकसान झाले आहे.खेडी येथे १७ शेतकऱ्यांचे ०७ हेक्टर क्षेत्रात केळीचे नुकसान झाले आहे.भोकरी येथे १८ शेतकऱ्यांचे ०८ हेक्टर क्षेत्रात केळीचे नुकसान झाले आहे.सनपूले येथे १७ शेतकऱ्यांचे ०९ हेक्टर क्षेत्रात केळीचे नुकसान झाले आहे.

४)धानोरा महसूल मंडळात पिंप्री येथे २४ शेतकऱ्यांचे १६ हेक्टर क्षेत्रात केळीचे नुकसान झाले आहे.५) अडावद महसूल मंडळात वडगाव बु! येथे ३८ शेतकऱ्यांचे १५ हेक्टर क्षेत्रात केळीचे नुकसान झाले आहे,वटार येथे २९ शेतकऱ्यांचे १३ हेक्टर क्षेत्रात केळीचे नुकसान झाले आहे,सुटकार येथे ३५ शेतकऱ्यांचे १४ हेक्टर क्षेत्रात केळीचे नुकसान झाले आहे.असे एकूण पाच महसूल मंडळात १७ गावातील ७९२ केळी उत्पादक शेतकऱ्यांचे ५००.७५ हेक्टरवरील केळी बागांचे नुकसान झाल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com