कार डिलरशीपच्या नावाखाली साडेपाच लाखांचा गंडा

बनावट मेलद्वारे केली ऑनलाईन फसवणूक;सायबर पोलिसात गुन्हा दाखल
सायबर क्राइम
सायबर क्राइम

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

कारची डिलरशिप (Car dealership) देण्यासाठी आटीजीएस करुन पैसे ट्रान्सफर करुन रावेर येथील व्यावसायिकाची (Professional) 5 लाख 50 हजारात फसवणुक (Fraud) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस (cyber police station)ठाण्यात गुन्हा (Crime ) दाखल करण्यात आला आहे.

रावेर जिल्ह्यातील मोरगाव खुर्द येथील विजय एकनाथ पाटील हे वास्तव्यास असून त्यांचा ट्रॅक्टर डिलरशीपचा व्यवसाय आहे. त्यांना बर्‍हाणपुर येथे कारच्या डिलरशीपचा व्यवसाय सुरु करायचा असल्याने त्यांनी ऑक्टोंबर 2022 मध्ये वेबसाईटवर माहिती भरली होती. त्यानंतर दि. 22 मार्च रोजी कंपीच्या मेल आला आणि एका अनोळखी क्रमांकावरुन अशोक पांडे नामक व्यक्तीचा विजय पाटील यांना फोन आला.

त्यांनी सांगितले की, कारच्या डिलरशीप देण्यासाठी आपण केलेल्य अप्लाय तीन जणानी अप्लाय केले आहे. तुम्हाला डीलरशीप हवी असेल तर कंपनीच्या बँक खात्यावर आरटीजीएसद्वारे 5 लाख 50 हजार रुपये ट्रान्सफर करा असे सांगतल्यानंतर पाटील यांनी पैसे ट्रान्सफर केले. त्यानंतर दि 24 मार्च रोजी धरणीधर पाटील नावाच्या व्यक्तीचा विजय पाटील यांना फोन आला. त्याने त्यांनी फुल सिक्युरीटी डिपॉझीटसाठी 26 लाख 75 हजार भरावे लागतील असे सांगितले. परंतु पाटील यांनी माझ्याकडे इतके पैसे नसल्याचे सांगतले.

भेटण्यासाठी बोलविल्याने घटना उघडकीस

समोरील ऑनलाईन ठगाने पैसे भरण्यासाठी वारंवार विजय पाटील यांच्याकडे तगादा लावल्याने त्यांनी लागलीच शोरुमला भेट देत माहिती जाणून घेतली. याठिकाणी त्यांना फसवणुकीचा प्रकार असू शकतो असे सांगितले. त्यानंतर पाटील यांनी ऑनलाईन ठगाला भेटण्यासाठी विचारले असता त्याच्याकडून टाळाटाळ केली जात होती. आपली फसवणुक झाल्याचे कळताच पाटील यांनी सायबर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार ठगाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com