शॉर्ट सर्किटमुळे पाच एकर मका, ठिंबक नळ्या जळून खाक

पाच लाखांचा नुकसानीचा अंदाज, पंचनाम्याची मागणी
शॉर्ट सर्किटमुळे पाच एकर मका, ठिंबक नळ्या जळून खाक

बोदवड - प्रतिनिधी Bodwad

तालुक्यात सलग तीन चार दिवसापासून वादळी वारे विजा व ढगाचा गडगटात पाऊस होत आहे मंगळवारी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास करंजी येथे वादळ आले. त्यात पाच देवळी शिवरातील पुरुषोत्तम जानकीराम पाटील यांच्या शेतातील (गट क्रमांक ६९) झाल्याने जळून खाक झाल्याची घटना घडली.

शॉर्ट सर्किटमुळे पाच एकर मका, ठिंबक नळ्या जळून खाक
चाळीसगावच्या दुचाकीस्वाराची अडवणूक ; धुळे येथील पोलीस एसीबीच्या जाळ्यात

याच घटनेत ठिबक नळ्या देखील जळुन खाक झाल्या त्यामुळे मका व ठिबक नळ्या मिळून सुमारे पाच लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे महावितरणच्या हलगर्जीपणामुळे वीज वाहिनीचे तार खाली असल्याने शॉर्टसर्किट होऊन हातातोंडाशी आलेला मका जळून खाक झाल्याने समजते त्यामुळे शेतकरी पाटील यांनी नुकसानीच्या पंचनामाची मागणी केली करंजी पाच देवळी येथील शेतकरी घटनास्थळी उपस्थित होते करंजीत येथील शिंदे शिवसेना गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली कृषी सहाय्यक सुदर्शन शिंदे हेही उपस्थित होते राष्ट्रवादीचे रामदास पाटील यांनी नुकसानीची पाहणी केली शॉर्ट सर्किट वादळामुळे झाल्याने पंचनामासाठी वीज महावितरणचे अधिकारी उपस्थित असणे गरजेचे होते पण ते कोणीही हजर नसल्याने पंचनामा होऊ शकला नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com