कृषी मंत्र्यांच्या मतदार संघात पहिली आत्महत्या

कर्जाच्या नैराश्याने केली आत्महत्या
 कृषी मंत्र्यांच्या मतदार संघात पहिली आत्महत्या

सोयगाव, Soygaon

कर्जाच्या नैराश्याने (debt depression) व खरिपाच्या पिकांची अवस्था (Status of Kharipa crops) पाहून अल्पभूधारक शेतकऱ्याने (Smallholder farmers) थेट सोनसवाडी शिवारातील (Sonaswadi Shivara) खडकी धरणात (Khadki Dam) उडी मारून आत्महत्या (Suicide by jumping) केल्याची घटना रविवारी पहाटे उघडकीस आली आहे.

या घटनेमुळे सोयगाव, आमखेडा परिसरात शोककळा पसरली आहे याप्रकरणी महसूल विभागाकडून शेतकरी आत्महत्येची नोंद घेऊन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आला असून सोयगाव पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.

रामजी सोनू ढगे(वय ५६) असे धरणात उडी मारून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नाव असून सोनसवाडी शिवारातील गट क्र-२७ ,मध्ये त्यांची एक हेक्टर दहा आर जमीन आहे,यंदाच्या खरिपाच्या हंगामात त्यांनी कर्ज घेऊन खरिपाच्या पेरण्या केल्या. परंतु हंगामापासूनच सोयगाव परिसराला पावसाने दगा दिल्याने खरिपाच्या पिकांसह कपाशी पिकांची अवस्था पाहून नैराश्य आलेल्या ५६ वर्षीय शेतकऱ्याने कर्ज फेडण्याच्या विवंचनेत शनिवारी रात्री घरातून निघून थेट खडकी धरणात उडी घेत जीवन संपविले.

रविवारी पहाटे मृत शेतकरी रामजी सोनू ढगे यांचे मृतदेह पाण्यावर तरंगून आढळून आल्याची माहिती मिळताच सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला व शवविच्छेदन साठी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर अंत्यसंस्कार साठी मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला. मृत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी,दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे.रविवारी सायंकाळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले...

कृषी मंत्र्यांच्या मतदार संघात पहिली आत्महत्या

ठाकरे सरकार कोसळल्या नंतर स्थापन झालेल्या शिंदे सरकार मधील मंत्री कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याच मतदार संघातील तालुक्यात पहिली आत्महत्या झाल्याची नोंद झाली असून कृषी मंत्री असलेल्या तालुक्यातच शेतकरी आत्महत्यांना सोयगाव तालुक्यात प्रारंभ झाला आहे..

सोयगाव तालुक्यात पावसा अभावी पीक स्थिती चिंताजनक झालेली आहे त्यातच वाढत्या उन्हांच्या झळानी पिकांची वाताहात झालेली असून वन्यप्राण्यांच्या धुडगूस मुळे पिकांची नुकसान होत आहे याकडे वनविभाग, कृषी विभाग दुर्लक्ष करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com