
जळगाव jalgaon
शहरातील स्टेट बँक चौकात (State Bank Chowk) गोळीबार (firing) झाल्याची घटना रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली. यात कोणीही जखमी (No one was injured) झालेले नसून संशयीतांनी (doubt) घटनास्थळावरून पलायन केले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेला पोलिसांकडून (police) दुजोरा मिळाला आहे.
शहरातील स्टेडियम चौकातील स्टेट बँक जवळ एमआयडीसी पोलीस ठाण्यातील एका हद्दपार आरोपीकडून किरकोळ वादाच्या कारणावरून गोळीबार केल्याची घटना रविवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली.
संशयीत गोळीबार केल्यानंतर घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळतात पोलीस उपअधीक्षक संदीप गावित, जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी, पोलीस निरीक्षक किशोर पवार, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. फायर झालेल्या घटनास्थळाची पोलिसांकडून तपासणी केली जात होती. याप्रकारचे रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.