पोलीसाच्या नवीन वसाहतीतील ७ व्या मजल्यावर आग

आगीत संसाराेपयोगी वस्तू जळुन खाक
पोलीसाच्या नवीन वसाहतीतील ७ व्या मजल्यावर आग

जळगाव-jalgaon

शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयात (Superintendent Police office) काही दिवसांपूर्वी उभारण्यात आलेल्या नवीन वसाहतीच्या (new colony) ३ नंबरच्या इमारतीत (building no.3) सातव्या मजल्यावर (seventh floor) एका पोलीस कर्मचाऱ्याच्या (policeman) घराला आग (house caught fire) लागल्याची घटना मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. घरातील गणपतीजवळ लावलेल्या दिव्यामुळे (lamp placed near Ganapati) ही आग (fire) लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयात नवीन वसाहतीच्या ३ इमारतीत सातव्या मजल्यावर खोली क्रमांक ७० २ येथे पोलीस कर्मचारी ईश्वर पंडीत पाटील हे वास्तव्याला आहे. ते स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. ते घर बंद करुन बाहेर गेले होते. यादरम्यान नऊ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरातून धुराचे लोट बाहेर पडल्याचे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांना दिसून आले. त्यांनी हा प्रकार ईश्वर पाटील यांना कळविला.

त्यानुसार ईश्वर पाटील घरी परतले. घराचा दरवाजा उघडताच प्रचंड धूर बाहेर निघाला. त्यानंतर फायर इस्टींगव्युशरच्या तसेच शेजारच्या नागरिकांनी पाण्याचा मारा घरात आग विझविली. घरात गणपती जवळ लावलेल्या दिव्यामुळे गणपतीभोवती केलेल्या सजावटीच्या साहित्याने पेट घेतला. यामुळे हॉलमधील साहित्याला आग लागली.

यात टीव्ही, लाकडी कपाट, शिलाई मशीन अशा संसासरपयोगी वस्तू जळून नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.

या घटनेची पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये एकच चर्चा होती. घटनेची माहिती मिळाल्यावर गर्दीही घटनास्थळी झाल्याचे दिसून आली या प्रकरणी पोलिसात रात्री उशीरापर्यंत कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com