
आडगाव, Adgaon ता. एरंडोल ( वार्ताहर )
आडगाव येथील प्लॉट एरियात (plot area) दुपारी 12 वाजेच्या सुमारास आग (Fire) लागली. आगीचे स्वरूप एवढे होते की काही वेळातच संसार उद्ध्वस्त (Destroyed) झाले.
दुपारी कडक होते . त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. साहेबराव हिरामण पाटील यांच्या मालकीच्या प्लॉट मध्ये रहिवासी असलेले सांबा धना बारेला यांच्या घरात 2 लहान मुली, एक मुलगा ,नातू होते. घरात आग (House fire) लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता मुलांना बाहेर काढले. मात्र बारेला यांचा संसार उध्वस्त झाला. यात जीवितहानी झाली नाही. मात्र, पाच गाई (Cows) ,दोन बकऱ्या (goats), पंचवीस-तीस कोंबड्या (hens) जळून खाक झाल्या. यासोबत घरातील अन्नधान्य, कपडे ,शिलाई मशीन, टीव्ही, एक नवीन मोटरसायकल (Motorcycle) व रोकड 60 ते 70 हजार रुपये जळून (burnt) खाक झाले. गुरांचा चारा ही जळाला.
एक कुटुंब उघड्यावर आले असून साहेबराव हिरामण पाटील, शिवराम खंडू महाजन, शिवाजी लुकडू महाजन इत्यादी,यांच्या गोठ्यातील गुरांचा चारा व पत्रे जळून खाक झाली.
आग विझवण्यासाठी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य ,लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी प्रयत्न केले .सोबत एरंडोल, भडगाव अग्निशमन (Firefighting) दलाच्या गाड्या कार्यरत होत्या. दीड ते दोन तासानंतर आग विझवण्यात आली.
प्रशासनाकडून मंडळ कृषी अधिकारी अमोल शिंपी, पोलीस पाटील, व पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी पंचनामे (Punchnama) केले.