
चिनावल ता.रावेर (वार्ताहर) raver
येथील प्रकाश गोपाळ भालेराव हे होमगार्ड (Home Guard) अल्प आजाराने नुकतेच निधन झाले त्यांच्या कुटुंबीयांना सावदा होमगार्ड युनिट (Sawada Home Guard Unit) मार्फत तसेच सावदा (police) पोलिस स्टेशन मार्फत आर्थिक मदत संपूर्ण करण्यात आली.
सावदा होमगार्ड युनिट मध्ये कार्यरत प्रकाश भालेराव यांचे निधन झाले होते त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक हातभार द्यावा या उद्देशानेच सावदा होमगार्ड युनिट तर्फे १६००० ची आर्थिक मदत तर सावदा पोलिस स्टेशन मार्फत ३१००० रू ची मदत सावदा पो स्टे चे सपोनि देविदास इंगोले, पो उप निरीक्षक समाधान गायकवाड, होमगार्ड प्रभारी अधिकारी दिपक खाचणे, निलेश खाचणे, प्रकाश साफकर, अनिल तडवी आदी उपस्थित होते. यावेळी मयत प्रकाश भालेराव यांच्या पत्नी व मुलाने हे मदत स्विकारली.