जळगाव jalgaon। प्रतिनिधी
जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक (Election of District Milk Association) लवकरच जाहीर होणार आहे. तत्पूर्वी या निवडणूकीसाठी संस्थांकडून (institutions) ठराव मागविले (Resolution requested) जात आहे. दरम्यान राजकीय सोयीसाठी (political convenience) मोठे अर्थकारण (Big money) करून दूध संघाच्या सेवानिवृत्त अधिकार्यांकडून (Retired Officers) हे ठराव केले जात असल्याची माहिती एका सभासदाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.
सहकार क्षेत्रात मोठी असलेली संस्था जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (Jalgaon District Co-operative Milk Producers Association) संचालक मंडळाची (Board of Directors) मुदत संपुष्टात आली आहे. जिल्हा बँकेनंतर आता जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीच्या ((Election) हालाचाली गतीमान झाल्या आहेत. जिल्हा दूध संघासाठी दि. 23 जूनपर्यंत ठराव दाखल करण्याची अंतीम मुदत आहे.
यासाठी पात्र संस्थांकडून ठराव मागविण्यात आले आहे. मात्र या सर्व प्रक्रियेत अपात्र संस्थांचे लेखापरीक्षण करून त्यांना पात्र दाखवून ठराव लिहीले जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसेच काही पुढार्यांकडून (political convenience) हे ठराव एका खासगी इमारतीत दुध संघाच्या पाटील आणि सुर्यवंशी नामक सेवानिवृत्त अधिकार्यांकडुन केले जात असल्याचेही एका सभासदाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे. यासाठी मोठे अर्थकारण (Finances) होत असून यात तीन ते चार लेखापरीक्षकांचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
भडगाव आणि अमळनेरातून
फिरतेय अर्थचक्र
जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील भडगाव आणि अमळनेर तालुक्यातून सर्वाधिक अर्थचक्र फिरत असल्याची माहिती संबंधित सभासदाने दिली आहे. या दोन्ही तालुक्यात सर्वच पक्षांचे पुढारी हे बलाढ्य असून दुध संघासाठी जोर लावला जात आहे.
ठरावांची चौकशी होण्याची शक्यता
जिल्हा दूध संघासाठी राजकीय सोयीनुसार ठराव केले जात आहे. यासाठी होत असलेल्या अर्थकारणाची आता जोरदार चर्चा होत असून यासंदर्भात काही जणांचे कॉल रेकॉर्डींग (Call recording) करण्यात आले असून याबाबतचे सीसीटीव्ही फुटेजही गोळा करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान या सर्व प्रकाराची चौकशी होऊन फौजदारी स्वरूपाचा (Criminal interrogation) गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही संबंधीत सभासदाने केली आहे.