अखेर आरटीईसाठी 2940 विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर

2399 विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी; शिक्षण विभागाकडून आदेश प्राप्त
अखेर आरटीईसाठी 2940 विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

सन 2022-23 साठी इयत्ता पहिलीमधील प्रवेशाकरीता (Admission to the first) 17 फेबु्रवारी पासून ते 10 मार्चपर्यंत पालकांनी (Parents apply) आपल्या पाल्यांचे प्रवेश अर्ज (child's admission) ऑनलाईन पध्दतीने भरले होते. जिल्ह्यातील 285 शाळांमध्ये (Schools) एकूण 3147 जागांसाठी 8354 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 2940 विद्यार्थ्यांची निवड यादी (Student selection list) जाहीर (announced) करण्यात आली असून 2399 विद्यार्थी प्रतीक्षा यादीत असल्याची माहिती पुणे शिक्षण विभागाने (Pune Education Department) दिली आहे.

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार अधिनियम (Right to Free and Compulsory Education of Children Act) 2009 नुसार वंचित व दुर्बल घटकातील मुलांना विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यीत शाळांमध्ये 25 टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसार 17 फेब्रुवारीपासून आरटीईसाठी प्रवेश प्रक्रिया (Admission process for RTE) जिल्ह्यात राबविण्यात आली होती. 4 एप्रिल रोजी आरटीई निवड यादी जाहीर करण्यात आली आहे.

30 मार्च रोजी पुणे शिक्षण संचालक यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे (State Council for Education Research and Training Pune) येथे 4 एप्रिल रोजी दुपारी 4 वा. ऑनलाईन लॉटरी काढण्यात आली. एनआयसी विभागाच्या सॉफ्टवेअरनुसार प्रक्रिया पुर्ण होऊन 4 एप्र्रिल रोजी 2940 मुलांची निवड यादी व 2399 विद्यार्थ्यांची प्रतिक्षा यादी (Waiting list) प्रसिध्द करण्यात आली आहे.

ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे अशा विद्यार्थ्यांना राज्य स्तरावरून संदेश पाठविण्यात आले आहे. संपुर्ण राज्याची प्रक्रिया असल्याने विद्यार्थ्यांनी संदेशाची वाट न पाहता पालकांनी संकेतस्थळावर (website) आपल्या पाल्यांचे अर्जाची सद्यस्थिती जाणून घ्यावी असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील (Primary Education Officer Vikas Patil) यांनी केले आहे.

निवड झालेल्या मुलांच्या पालकांनी स्वत:च्या लॉगइनमधुन अ‍ॅडमिशन कार्ड (Admission card) काढुन आवश्यक कागदपत्रांसह नजीकच्या पडताळणी केंद्रावर जाऊन प्र्रवेश निश्चित करावा. पाल्याचा प्रवेश निश्चित झाल्याची पावती घेऊन शाळेत जावे अशा सूचना पुणे शिक्षण संचालकांनी दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.