अखेर धानोरा येथील 'त्या' गणेश‌ मुर्तींचे पहाटे पाच वाजता झाले विसर्जन

घटनेबाबत पोलीसात दाखल गुन्हा नाही
अखेर धानोरा येथील 'त्या' गणेश‌ मुर्तींचे पहाटे पाच वाजता झाले विसर्जन

धानोरा Dhanora ता. चोपडा (वार्ताहर)

येथे रविवारी गणेश विसर्जन मिरवणूकीत (Ganesh immersion procession) गणेशभक्त व पोलिसांमध्ये वाद्य वाजवण्यावरून वाद (Argument over playing an instrument) झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी दोन गणेश मंडळाचे विसर्जन थांबवले (Immersion stopped) होते.त्या मंडळांचे सोमवारी सकाळी चक्क पाच वाजता पोलीस व महसूल प्रशासनाच्या विनंती वरून ठराविक ग्रामस्थांच्या उपस्थितीत विसर्जन (Ganesha idol) करण्यात आले.सदर घटनेबाबत अडावद पोलिस स्टेशन ला कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी की, धानोरा येथे रविवारी पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन मिरवणूक सुरू होती. काही मंडळांची मिरवणूक संपली होती तर दोन मंडळांचे विसर्जन बाकी होते. मात्र रात्री दहा वाजले म्हणून वाजंत्री बंद करा, असे म्हणत अडावद पोलिस स्टेशन चे एपीआय किरण दांडगे यांनी मिरवणुकीत वाद्य वाजवणाऱ्यांना मारहाण करत मिरवणूक थांबवली. यामुळे संतप्त गणेश भक्त व ग्रामस्थांनी जागेवरच ठिय्या दिला. एपीआय दांडगे यांनी अचानक लाठीचार्ज चे आदेश दिले.

पोलिसांनी अबाल वृद्धांसहीत महीला व‌ व्यावसायिक ग्रामस्थांनाही बेदम मारहाण केली.यात अनेक जण जखमी झाले. यामुळे बिथरलेल्या ग्रामस्थांनी पोलिसांवरही दगडफेक केली. त्यातही काही पोलिस जखमी झाले. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
आणि अशातच पोलिसांनी गावातून काढता पाय घेतला.नंतर जमाव आक्रमक होऊन त्या दोन मंडळाचे विसर्जन रोखण्यात आले यावेळी विशेष दंडाधीकारी म्हणून नेमणूक असलेले महसुलचे सचिन बांबळे,मंडल अधिकारी आर.आर.महाजन,तलाठी विकास पाटील हे घटनास्थळी थांबून होते.

मात्र गणेश मुर्ती चे विसर्जन थांबून असल्याने पोलिस व महसूल प्रशासनाची धावपळ सुरू झाली. अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, नायब तहसीलदार सचिन बांबळे,यांच्या अथक प्रयत्नानंतर.पोलीस पाटील दिनेश पाटील, माजी पंचायत समितीचे उपसभापती माणिकचंद महाजन, गोकुळ कोळी, समाधान कोळी, विजय चौधरी, किरण बोवा तायडे,विशाल महाजन, यांच्या उपस्थितीत पहाटे पाच वाजता त्या दोन गणेश मुर्ती चे विसर्जन करण्यात आले.सदर घटनेबाबत पोलिस स्टेशन ला कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे कळवले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com