अखेर ठरलं... गुलाबराव देवकर आज देणार राजीनामा

अखेर ठरलं... गुलाबराव देवकर आज देणार राजीनामा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा बँक संचालकांच्या बैठकीत निश्चित झाल्यानुसार जिल्हा बँकेचे अध्यक्ष (District Bank Chairman) गुलाबराव देवकर (Gulabrao Deokar) हे उद्या दि. 7 रोजी अध्यक्षपदाचा राजीनामा (Resignation of the presidency) देणार आहेत.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपुष्ठात आला आहे. जिल्हा बँक निवडणुकीवेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाबाबत फॉर्म्युला निश्चित केला होता. त्यानुसार तीन वर्ष विभागुन राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष राहील तर दोन वर्ष शिवसेनेचा अध्यक्ष, तसेच तीन वर्ष शिवसेनेचा उपाध्यक्ष आणि उर्वरीत दोन वर्ष काँग्रेसचा उपाध्यक्ष असे ठरले होते. त्यानुसार शनिवारी दि. 4 रोजी जिल्हा बँकेच्या संचालकांची बैठक राष्ट्रवादीचे नेते आ.एकनाथराव खडसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली या बैठकीत सोमवार दि. 6 रोजी कार्यकाळ संपल्याने गुलाबराव देवकर अध्यक्षपदाचा राजीनामा देतील असे ठरले होते. ठरल्याप्रमाणे गुलाबराव देवकर हे उद्या दि. 7 रोजी सकाळी 11 वा. अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत.

अध्यक्षपदाकडे लक्ष

जिल्हा बँकेच्या पुढील अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, संजय पवार, अ‍ॅड. रोहिणी खडसे यांची नावे चर्चेत आहेत. आता अध्यक्षपदावर कुणाची वर्णी लागते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

कार्यकर्त्यांशी चर्चेअंती निर्णय - गुलाबराव देवकर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पॅनलचा प्रचार केला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांशी राजीनाम्याबाबत चर्चा करणे आवश्यक होते. कार्यकर्त्यांशी झालेल्या चर्चेअंती अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी दैनिक देशदूतशी बोलतांना दिली.

गुलाबराव देवकर अध्यक्ष जिल्हा बँक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com