अखेर मधुकर साखर कारखान्यावर जिल्हा बँकेचा ताबा

55 कोटींच्या थकबाकीपोटी बँकेने केली कारवाई
अखेर मधुकर साखर कारखान्यावर जिल्हा बँकेचा ताबा

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात (field of cooperation) महत्वाची संस्था असलेला मधुकर सहकारी साखर कारखान्यावर (Madhukar Sugar Factory) आज जिल्हा बँकेकडुन ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली. जिल्हा बँकेचे (District Bank) कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख (Executive Director Jitendra Deshmukh) यांच्यासह बँकेच्या पथकाने सोमवारी हा ताबा (Took possession)घेतला.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एनपीएचे प्रमाण 40 टक्केपेक्षा अधिक असल्याने जिल्हा बँकेने थकबाकी वसुलीसाठी (Recovery of arrears) धडक मोहिम राबविली. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील मधुकर सहकारी साखर कारखान्यांकडे (Madhukar Sugar Factory) देखिल गत तीन वर्षांपासून 55 कोटी रूपयांची थकबाकी (Arrears of Rs 55 crore) आहे. त्यामुळे जिल्हा बँकेने यासंदर्भातही संबंधित कारखान्यांकडे वसुलीसाठी पत्रव्यवहार केले.तसेच कारखान्याला नोटीस देऊन साठ दिवसांची मुदतही देण्यात आली होती. मात्र थकबाकी भरू न शकल्याने अखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सोमवारी सिक्युटरायझेशन अ‍ॅक्टअंतर्गत (Securitization Act) मधुकर सहकारी साखर कारखाना ताब्यात घेतला.

यांनी केली कारवाई

मधुकर साखर कारखाना ताब्यात घेण्याच्या प्रक्रिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, प्राधिकृत अधिकारी एम.टी. चौधरी, राजेंद्र पाटील, एस.आर. राणे यांच्यासह बँकेच्या अधिकारी राबविली.

Related Stories

No stories found.