Video आनंदवार्ता : सलग तिसर्‍यांदा गिरणा धरण शंभर टक्के भरले, चार दरवाजे उघडले

पाच हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग, १७५ गावांचा पाणी प्रश्‍न मिटला

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

गिरणा धरण (Girna Dam) परिक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे गिरणा धरण आज संकाळी सात वाजता शंभर टक्के भरले आहे. धरण भरल्यामुळे ५००० क्युसेसने खाली (Girna River) गिरणा नदीत सोडण्यात येत आहे. धरणाचे चार दरवाजे १ फुटने उघडण्यात आलेले आहेत. नदीतील सोडलेले पुराचे पाणी आवक नुसार कमी, जास्त होऊ शकते, तरी सर्वांनी सतर्क रहावे असे आवाहन पाटबंधारे विभागाचे उपअभियंता हेमंत पाटील यांनी केले आहे.

गिरणा धरण क्षेत्रावरील धरणे भरल्यामुळेे गेल्या दोन-तीन दिवसांपासून गिरणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असून काल सायंकाळी गिरणा धरणात ९६ टक्के पाणी साठा होता. मात्र कालपासून गिरणा धरण क्षेत्रावरील नदीच्या पाण्याने वाहत असून आज मितीस गिरणा धरणात पाच हजार क्युसेसने पाणी येत आहे. त्यामुळे आज संकाळी गिरणा धरण १००% जिवंत पाणी साठ्याने भरले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अभियंता हेमंत पाटील यांनी दिली आहे. आज संकाळी सहा वाजता गिरणा धरणाचे चार दरवाजे एका फुटाने उघडण्यात आले असून या गेटमधून सहा हजार क्युसेस पाणी गिरणा नदीतून वाहत आहे. गिरणा धरण सलग तिसर्‍यादा पूर्णक्षमतेने भरल्यामुळे चाळीसगावसह भडगाव, पाचोरा, मालेगाव तालुक्यातील १७५ गावांचा पाणी प्रश्‍न मिटला आहे. त्यामुळे ही समाधानाची बाब आहे.

Related Stories

No stories found.