माझ्यासोबत प्रेम करावे लागेल असे म्हणत अल्पवयीन मुलीचे अपहरण

रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल
माझ्यासोबत प्रेम करावे लागेल असे म्हणत अल्पवयीन मुलीचे अपहरण

जळगाव - jalgaon

शहरातील एका भागात अल्पवयीन १४ वर्षीय मुलीचे अपहरण केले. तसेच माझ्यासोबत प्रेम करावे लागेल असे यासाठी मुलीला दिवसभर घरात बसवून तरुणाने तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी रामानंदनगर पोलिसात (Ramanandnagar Police) तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील एका भागात अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. याच परिसरात तरुण राहतो. सोमवारी अल्पवयीन मुलगी कचरा फेकायला गेली असता, मुलीला तरुण त्याच्या घरात ओढून घेवून गेला.

माझ्यासोबत प्रेम करावे लागेल असे सांगून तरुणाने मुलीला दिवसभर घरात बसवून ठेवले. त्यानंतर तिच्यासोबत मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला. तसेच मुलीला धमकावून भिती निर्माण केली. हा प्रकार समोर आल्यानंतर मुलीच्या आईने मंगळवारी याबाबत रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक गोपाळ देशमुख करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com