बस वाहक महिलेला जातीवाचक शिवीगाळ

चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल
बस वाहक महिलेला जातीवाचक शिवीगाळ

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

तालुक्यातील हातगाव (Hatgaon) येथील एका महिलेला पतीशी प्रेमसंबंध ठेवून प्रेमविवाह केल्याच्या वादातून नातलगांनी शिवीगाळ करीत जातीयवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार (Rural Police) ग्रामीण पोलीसांत दाखल झाली आहे.

(chalisgaon) चाळीसगाव आगारातील ३५ वर्षीय (s t bus) बस वाहक (रा. हातगाव) महिलेने प्रेमविवाह (Love marriage) केल्याच्या वादातून तिची नणंद सिमा संचय नांदे, भाचा विशाल संजय नांदे, अक्षदा महेश शेजवळ, मुस्कान उर्फ दुर्गा शेख अशांनी हातगांव येथे येवून जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार महिलेने दिल्याने वरील सर्वांच्या विरोधात गु. र. नं. ९२/२०२२ अनु. जाती. जमाती (Atrocity) ॲट्रासिटी कलम ३ (१) आर. एस. तसेच भादवि कलम ५०४, ५०६, ५०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास (police) पोलीस करीत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com