सोशल मीडियावर महिलेची बदनामी

महिलेविरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल
सोशल मीडियावर महिलेची बदनामी

जळगाव : jalgaon

सोशल मिडीयावर (Social media) महिलेची वैयक्तिक व खाजगी माहितीसह मोबाईल क्रमांक शेअर करुन बदनामी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी महिलेची बदनामी करणार्‍या महिलेविरुध्द सायबर पोलीस (Cyber ​​police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्ह्यातील एका तालुक्याचे ठिकाण असलेल्या शहरातील दोन्ही महिला आहेत. ४३ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार ४ डिसेबंर २०२० ते ६ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत याच शहरात राहणार्‍या महिलेने दुसर्‍या महिलेच्या नावाने (Share chat) शेअर चॅट ॲप्लीकेशन या सोशल मीडिया साईटवर वैयक्तीक व खासगी माहितीसह मोबाईल क्रमांक शेअर केला. ही माहिती स्वत: या महिलेनेच शेअर केल्याचे आरोपी महिलेने भासविले. त्यावर अनेक लोकांनी फिर्यादी महिलेला वेगवेगळ्या क्रमांकावरुन कॉल केले. त्यामुळे महिलेची बदनामी तर झालीच शिवाय मानसिक त्रासही झाला. हा प्रकार शहरातील महिलेने केल्याचे सिध्द झाल्यानंतर तिच्याविरुध्द सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com