पाटणा अभयारण्यात एकाचा हातपाय बांधून खून

चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
पाटणा अभयारण्यात एकाचा हातपाय बांधून खून

चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील (Patna) पाटणा अभयारण्यात गुरे चारण्यासाठी गेलेला एकाचा मृतदेह काल आढळुन आला होतो. घटनास्थळी ग्रामीण पोलीसांनी पंचनामा केला असता त्या इसमाचा हातपाय बाधून खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला रात्री उशिरा खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आले. मयताचे नाव नाना ऊर्फ ज्ञानेश्‍वर संतोष पाटील असे आहे.

तालुक्यातील गणेशपुर येथील नाना संतोष पाटील(५०) हे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून जनावरे चारण्यासाठी पाटणा जंगलात जात होते. ते काही दिवस तेथे वास्तव्यास असायचा. बुधवारी त्यांचा मृतदेह पाटणा जंगलात आढळुन आला.

घनदाट जंगलात मृतदेह असल्यामुळे पोलिसांना त्यांच्या पर्यंत पोहचण्यासाठी तब्बत ५ ते १० कि.मीटर पायी जावे लागले. नाना पाटील यांचा मृतदेह हात-पाय बांधलेल्या अवस्थेत मिळुन आला. यावरुन नाना पाटील यांचा खून झाल्याचा स्पष्ट झाले आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला मुलगा निलेश पाटील यांच्या फिर्यांदीवरुन रात्री उशिरा अज्ञात इसमाचा विरोधात खूनांचा गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय ठेंगे हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.