विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

एरंडोल - erandol

येथील जहांगीरपुरा (Jahangirpura) भागात राहणा-या विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेने गळफास घेवून (Suicide) आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या (Suicide note) सुसाईड नोट वरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर अज्ञात व्यक्तीला शोधण्याचे आव्हान (police) पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

येथील जहांगीरपुरा भागात राहणा-या रुपाली विश्वनाथ पाटील या ३४ वर्षीय विवाहितेने २३ एप्रिल २०२२ रोजी दुपारच्या वेळी राहत्या घराच्या दुस-या मजल्यावर गळफास घेवून आत्महत्या केली होती.

रुपाली पाटील यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली असून त्यात एका अज्ञात व्यक्तीने केलेल्या बदनामी सहन न झाल्याने आत्महत्या केल्याचे नमूद केले होते. मयत रुपाली हिचे पच्छात नऊ वर्ष वयाचा मुलगा व तीन वर्ष वयाची मुलगी व पती असा परिवार आहे.

रुपाली पाटील यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत माझ्या घरच्यांचा काही दोष नाही, माझी अज्ञात व्यक्तीने केलेली बदनामी मी सहन करू शकले नाही, घरातील देव्हा-याजवळ एक पर्स असून त्यामध्ये मी शिलाई काम करून जमवलेली रक्कम असून ती माझ्या मुलांची आहे असा मजकूर आहे.

आयुष्यात मुलांसाठी खूप करायचे होते,मात्र मी हरले असून मुलगा व मुलीस सांभाळून घ्या असा भावनिक मजकूर आहे. याबाबत श्रीराम राजाराम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे यांचे मार्गदर्शनाखाली जुबेर खाटिक, अकिल मुजावर, मिलिंद कुमावत, राजेश पाटील तपास करीत आहेत. दरम्यान विवाहितेची बदनामी करणारा अज्ञात व्यक्ती कोण, विवाहितेने आत्महत्येसारखे टोकाचे पाउल का उचलले याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरु असून अज्ञात व्यक्तीस पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.

Related Stories

No stories found.