शिवसेनेच्या दीपाली सैय्यद यांच्यावर गुन्हा दाखल करा!

भाजपकडून शहर पोलीस निरीक्षकांना निवेदन
शिवसेनेच्या दीपाली सैय्यद यांच्यावर गुन्हा दाखल करा!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शिवसेना (Shiv Sena) नेत्या दिपाली सैय्यद (Deepali Syed) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्याविषयी केलेले वक्तव्य राष्ट्रदोही असून निषेधार्थ आहे. हे वक्तव्य देशाच्या दृष्टीने घातक असून दिपाली सैय्यद यांच्यावर गुन्हा दाखल (Filed a crime) करा अशा मागणीचे निवेदन भाजपा (bjp) जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा (District Mahila Morcha President) दिप्ती चिरमाडे यांनी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षकांना दिले आहे.

सत्ताधारी पक्षाकडून देशात गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सामाजिक आराजकता (Social chaos) माजविण्याचे काम करीत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. भाजपनेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांच्यावर टिका करतांना शिवसेना नेत्या दिपाली सैय्यद (Deepali Syed) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यात त्यांनी त्या कारमध्ये सोमय्या काय तर मोदी असते तरीही ती फोडली असती असे वक्तव्य शिवसेनेच्या नेत्या दिपाली सैय्यद यांनी केले होते.

पंतप्रधान हे पद देशातील सर्वोच्च पद असून सुरक्षेच्या दृष्टीने आणि देशाच्या स्वाभिमानाच्या दृष्टीने दिपाली सैय्यद यांनी केलेले वक्तव्य हे राष्ट्रद्रोह असून निषेधार्थ (Prohibition) आहे. त्यांचे वक्तव्य देशासाठी घातक व अपमानजनक असून दिपाली सैय्यद यांना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा (District Mahila Morcha President) दिप्ती चिरमाडे (Dipti Chirmade) यांनी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

कारवाई न केल्यास आंदोलन

शिवसेना नेत्या दिपाली सैय्यद यांच्यावर गुन्हा दाखल करा. तात्काळ कार्यवाही न झाल्यास भारतीय जनता पार्टीतर्फे आ. गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे पोलिसांना देण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.