दुचाकीला कट मारल्यावरून तरुणांमध्ये हाणामारी

लोखंडी रॉडने मारहाण करत दगडफेक केल्याने ४ जण जखमी
दुचाकीला कट मारल्यावरून तरुणांमध्ये हाणामारी

जळगाव :- jalgaon

दुचाकीला कट (Cut the bike) मारल्याचा जाब विचारल्यावरुन गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास भुसावळ रोडवरील पन्नालाल वखारजवळ तरुणांच्या (young people) दोन गटात हाणामारी (Fighting) झाल्याची घटना घडली. दगडफेक व लोखंडी रॉडने केलेल्या मारहाणीत दुचाकीस्वारासह चार जण जखमी (Injured) झाले आहेत.

तांबापुरा परिसरातील अजमेरी गल्लीतील रहिवासी फरिद महंमद मुलतानी वय २० हा गुरुवारी त्याचा मित्र राहुल सोनवणे यांच्यासोबत दुचाकीने फटाके घेण्यासाठी सिंधी कॉलनी येथे गेले होते. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनीतील फटाके घेऊन पाचोरा रोडने तांबापुर्‍याकडे जात असतांना पाचोरा रोडने जळगावकडे येणार्‍या मालवाहु वाहनाने दुचाकीला कट मारला. मालवाहू वाहनांवरील चालकास कट का मारला त्याचा जाब विचारत तो निघून गेला. त्यानंतर मुलतानी व त्याचा मित्र सोनवणे याने त्याचा पाठलाग करून भुसावळ रोडवर पन्नालाल वखारजवळ वाहन थांबवले.

दुचाकीला कट का मारला त्याचा जाब विचारत असतांना घटनास्थळी दाऊद शहा हा आला. त्याने चारचाकीचालक माझा मित्र असून तुम्ही येथून निघून जा असे सांगत मुलतानी व सोनवणे यांना शिवीगाळ केली. राहुल सोनवणे तत्काळ पूर्ण करून मोहनसिंग बावरी व त्याच्या इतर मित्रांना घटनास्थळी बोलावले. तर दाऊद शहा यानेसुद्धा फोनवर सात ते आठ जणांना घटनास्थळी बोलावले. याठिकाणी तरूणांच्या दोन्ही गटात हाणामारी झाली.

मालवाहु वाहनावरील चालकाच्या बाजूने असलेल्या सात ते आठ जणांनी मुलतानी व त्याच्या मित्रांवर दगडफेक केली तर यात दाऊद शहा याने राहुल सोनवणे याच्या छातीवर लोखंडी रॉडने मारहाण केली. हाणामारीत राहुलसह फरीद मुलतानी, मोहनसिंग बावरी आणि अनिस हमीद पटेल व अनिल रमेश चौधरी या चौघांना दुखापत होवुन ते जखमी झाले आहेत.

याप्रकरणी फरीद मुलतानी याने दिलेल्या फिर्यादीवरून दाऊद शहा, अरबाज शहा, रफत शेख, इकबाल शेख, इकबाल जुनेद, भाई शेख, साहिल शहा, रेहान शेख सर्व रा. तांबापुरा या आठ जणांविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com