जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर आता खत टंचाईचे सावट

रशिया आणि युक्रेन युध्दाचा परिणाम ; भाववाढीचे संकेत
जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर आता खत टंचाईचे सावट

जळगाव jalgaon

रशिया आणि युक्रेन (Russia and Ukraine) या दोन्ही देशातील युध्दाचा (war) परिणाम अनेक देशातील आयात-निर्यातीवर (Import-Export) होत आहे. या युध्दामुळे जागतिक खत बाजारात (global fertilizer market) तुटवडा निर्माण होत असल्याने जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर (farmers) आता खत टंचाईचे सावट पसरले आहे. दरम्यान खतांचा मुबलक साठा करून ठेवण्याचे आवाहन जिल्हा कृषि अधीक्षक (District Agriculture Superintendent) संभाजी ठाकुर (Sambhaji Thakur) यांनी केले आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युध्दामुळे जागतिक खत बाजारात (fertilizer market) खत तुटवडा होण्याची शक्यता असुन खताच्या किंमती (Fertilizer prices) वाढण्याची दाट शक्यता आहे. भारत सर्वाधिक खतांची आयात करणारा देश असुन युध्दजन्य परिस्थीतीचा देशाला फटका बसण्याची शक्यता आहे. तरी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी सद्यस्थितीत बाजारात मुबलक प्रमाणात खत साठा (Fertilizer stocks) उपलब्ध असुन येणार्‍या खरीप हंगामासाठी (kharif season) खतांचा आवश्यक साठा करुन ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. रशिया व युक्रेन युध्दाच्या पार्श्वभूमिवर ऐन हंगामात खतांचा तुटवडा (Scarcity) भासणार नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी शक्य असेल तेवढी आवश्यक खते खरेदी करुन ठेवण्याचे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.
जिल्ह्यात मुबलक खते उपलब्ध
जिल्ह्यात ९६ हजार मेट्रीक टन खतांचा साठा उपलब्ध आहेत. त्यात ३३ हजार मेट्रीक टन युरीया, ३४ हजार मेट्रीक टन सिंगल सुपर ङ्गॉस्ङ्गेट आणि इतर असा मुबलक साठा (Fertilizer stocks) उपलब्ध आहे. शेतकर्‍यांनी तातडीने खतांचा आवश्यक तेवढा साठा करून घ्यावा अशी माहिती जिल्हा कृषि अधीक्षक संभाजी ठाकुर यांनी दिली. तसेच जागतिक खत बाजारातील खताच्या तुटवड्यामुळे खतांच्या किंमतीतही वाढ होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com