उन्हाळ्यात पावसाळ्याची अनुभूती; तापमानात घट; झाडांची पडझड

उन्हाळ्यात पावसाळ्याची अनुभूती; तापमानात घट; झाडांची पडझड

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

राज्यात आवकाळी पावसाचा कहर (Oncoming rain) सुरूच असून जळगाव शहरात दुपारपासून जोरदार वादळ वारा (Strong gale force winds)व पावसाला सुरवात (starts to rain) झाला. यात काही ठिकाणी झाड पडले तर अनेक रस्त्यांवर लागलेले होर्डींग देखील वादळामूळे तुटून रस्त्यांवर पडलेले होते. तर दुपारी तीन वाज्यापासून पावासाला जोरदार सुरवात झाली होती.

उन्हाळ्यात पावसाळ्याची अनुभूती; तापमानात घट; झाडांची पडझड
धुळे-दादर रेल्वेचा शनिवारपासून शुभारंभ.

गेल्या काही दिवसापासून अवकाळी पाऊस जळगाव जिल्ह्यात सुू आहे. अनेक ठिकाणी गारा, पाऊस तसेच सोसाट्याच्या वार्‍यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे तसेच घरांचे नुकसान झाले आहे. गुरूवारी मोहाडी गावाजळव जोरदार वार्‍यामुळे मोठा ट्रॉला ट्रक पलटून त्यात दोन जण ठार झाल्याची घटना घडली. शुक्रवारी दुपारी दोन वाजता अचानक आकाशात ढग दाटून येत जोरदार वार्‍याला सुरवात झाली. त्यामुळे रस्त्यांवरून जाणारे, रस्त्यांवर थाटलेले व्यवसायीकांची एकच धावपळ उडाली. तर

तापमानात प्रंचड घट

मार्च, एप्रिल महिन्यात जळगाव शहराचे तापमानात प्रचंड वाढ झाली होती. तापमानाचा पारा 43 अंशापर्यत गेले होते. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील तापमानात घट झालेली असून तापमान कमाल 36 अंश सेल्सिअस ते किमान 23 ते 25 डिग्री पर्यंत गेले होते.

पोलीस लाईनमध्ये झाड उन्मळुन पडले

छत्रपती शिवाजी महाराज संकुलनाजवळील पोलीस लाईनमध्ये जोरदार वारा सुरू झाल्याने मोठे झाड एका चारचाकी गाडीवर पडले. सुदैवाने या घटनेत जिवीत हानी झाली नाही. मात्र झाड उन्मळून पडल्याने काही वेळासाठी या रस्त्यावरील वाहतूक जाम झाली होती. तसेच विद्युत ताराही तुटून पडल्याने परिसरातील वीज पुरवठा बराच वेळ खंडीत झाला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com