पोलीस मुख्यालयात लाच घेतांना फौजदाराला अटक

२० हजार घेतांना जळगाव एसीबीने रंगेहाथ पकडले
पोलीस मुख्यालयात लाच घेतांना फौजदाराला अटक

जळगाव - jalgaon

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात (District Superintendent of Police Office) २० हजारांची लाच घेतांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी सहाय्यक फौजदार मिलिंद केदार यास रंगेहाथ पकडले. दरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालय आवारात घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांच्या पत्नीने महीला सहाय्य कक्ष,पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रारदार व त्यांचे कुटूंबियां विरुद्ध तक्रारी अर्ज केलेला आहे. या अर्जाच्या चौकशीअंती त्यांच्या पत्नीला कायदेशीर कारवाई करण्याबाबतचे पत्र दिल्यानंतर तक्रारदार यांना योग्य ती मदत करण्याचे कारण सांगुन महिला दक्षता कार्यालयातील सहाय्यक फौजदार मिलिंद केदार यांनी तक्रारदाराकडे २५ हजारांची मागणी केली.

तडजोडी अंती ही रक्कम २० हजार रुपये ठरली. याबाबत तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीनुसार पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहीरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, महेश सोमवंशी, नासिर देशमुख यांच्या पथकाने बुधवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात सापळा रचला. व सहाय्यक फौजदार मिलिंद केदार यांना तक्रारदाराकडून २० हजारांची लाच स्विकारतांना रंगेहाथ अटक केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com