हिंगोण्यातील तरुणाच्या खूनप्रकरणी पिता-पुत्राला कारावासाची शिक्षा

हिंगोण्यातील तरुणाच्या खूनप्रकरणी पिता-पुत्राला कारावासाची शिक्षा

भुसावळ सत्र न्यायालयाचा निकाल, कचरा टाकण्यावरून झाला होता वाद

यावल Yaval प्रतिनिधी

यावल तालुक्यातील हिंगोणा (Hingona) येथे अंगणात कचरा टाकण्याच्या (Garbage disposal) कारणावरून २८ वर्षीय तरुणाचा डोक्यात लाकडी दांडा मारून खून (murder) झाला होता. या प्रकरणी हिंगोण्यातील पिता-पुत्राविरुद्ध (Against father and son) फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करून भुसावळ येथील न्यायालयात दोषारोपपत्र (Indictment in court) दाखल केले होते. या खून प्रकरणी अतिरिक्त न्यायालयाचे सत्र न्यायाधीश आर. एम. जाधव यांनी आरोपी सोनल उर्फ संदीप सुभाष पाटील (वय ३४) याला ७ वर्षे, तर सुभाष देविदास पाटील (६४) याला दोन वर्षे कारावासाच्या (imprisonment) शिक्षेसह चार हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

हिंगोणा तालुका यावल येथील रहिवासी नितीन पांडुरंग बाविस्कर (वय २८, धोबी) यांच्याशी आरोपी सोनल उर्फ संदीप सुभाष पाटील व सुभाष देविदास पाटील यांचा अंगणात कचरा टाकण्यावरून (Garbage disposal) वाद झाला होता. त्यात सुभाष पाटील याने घरातून लाकडी दांडा आणून संदिपच्या हातात दिला. त्याने नितीनच्या डोक्यात हा दांडा मारल्याने तो जागीच गतप्राण झाला होता. ७ सप्टेंबर २०१९ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. या दोन्ही आरोपींविरुद्ध (Accused) फैजपूर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल होता. भुसावळ येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एम.जाधव यांच्या न्यायासनापुढे खटल्याचे कामकाज चालले.

सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे ९ साक्षीदार (Witness) तपासण्यात आले. त्यात मृताची आई गीताबाई, डॉ. नीलेश देवराज व तपास अधिकारी सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखेडे यांची साक्ष ग्राह्य धरण्यात आली. यानंतर आरोपी सुभाषला २ वर्षे व आरोपी सोनल याला ७ वर्षे कारावासाच्या (imprisonment) शिक्षेसह चार हजारांचा दंड सुनावण्यात आला. सरकारतर्फे ॲड. प्रवीण भोंबे यांनी काम पाहीले. पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार समीना तडवी यांनी सहकार्य केले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com