फेकरी रेल्वे उड्डाण पुलावर भीषण अपघात

एकाचा मृत्यू: दोन मालवाहू गाड्यांचे नुकसान; ट्रक चालक पसार
फेकरी रेल्वे उड्डाण पुलावर भीषण अपघात

फेकरी, Fekri, ता. भुसावळ । वार्ताहर

येथील रेल्वे उड्डाणपूलाजवळ (Near Railway Flyover) दोन वाहनांचा (two vehicles) भीषण अपघात (terrible accident) झाल्याची घटना 13 रोजी पहाटेच्या दरम्यान उघडकीस आली.

फेकरी रेल्वे उड्डाण पुलावर भीषण अपघात
Photo # गाढेगाव येथील ओढयावर पक्षी निरीक्षण कार्यक्रमात ४५ प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद

फेकरीचे पोलीस पाटील किशोर बोरोले हे नेहमीप्रमाणे हायवे रोड ने पहाटे फिरण्यासाठी जात असतात. त्यावेळी अपघात झाल्याची खबर त्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. फेकरी शिवारातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ राष्ट्रीय महामार्गावर दोन वाहनांचा अपघात होऊन त्यात मालवाहू वाहनाजवळ वाहन चालक रोडवर जखमी अवस्थेत पडलेला होता.

त्याच्या डोक्याला जबर मार लागून कानातून रक्त वाहत होते. तसेच सदर हायवे रोडवर एक माल ट्रक क्र.जी.जे.03 बी.टी.-5728 हे वाहन हायवे रोडवर अपघातात पलटी झालेले होते. सदर ट्रकमधील माल टाईल्स हे रोडावर अस्ताव्यस्त पडलेला होता. ट्रकच्या थोड्या अंतरावर एक अपघातग्रस्त मालवाहतूक वाहन क्रमांक एम. एच.28 ए. बी. 4334 या वाहनाच्या पुढील कॅबिन पूर्णपणे चक्काचूर होऊन मास्यांनी भरलेले ट्रे हे रोडवर अस्ताव्यस्त पडले होते. प्रसंगी पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशनला व हायवे मोबाईल व्हॅनला फोन केला.

फेकरी रेल्वे उड्डाण पुलावर भीषण अपघात
नाडगाव येथील १९ वर्षीय युवकाची गळफास घेत आत्महत्या

थोड्यावेळाने पोलिसांची गाडी व हायवेची मोबाईल व्हॅन घटनास्थळी आली व अपघातातील जखमींना जळगाव येथील वैद्यकिय महाविद्यालय दवाखान्यात रवाना करण्यात आले. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. त्यानंतर ट्रक क्र.जी.जे. 03-बी.टी-5728 यावरील अज्ञात चालक याने त्याच्या ताब्यातील मालट्रक हा भुसावळ कडून वरणगाव कडे भरधाव वेगाने येत असताना समोरून वरणगावकडून भुसावळकडे येणारे मालवाहतूक व्हॅन क्रमांक एम.एच.28 ए.बी.4334 या वाहनास समोरून जबरदस्त धडक दिल्याने वाहनावरील चालक रोडवर फेकला जाऊन त्याच्या डोक्यात जबर मार लागून तो गंभीर जखमी झाला.

याबाबत परिसरात खबर पसरतात घटनास्थळी जखमींचे नातेवाईक आले असता घटनास्थळी जखमीचे वडील अरुण सुखदेव मानेकर यांच्याकडून समजले की, अपघातातील मयत शिवचरण अरुण मानेकर (वय 28 वर्ष,रा.पहूर पुर्णी जिल्हा बुलढाणा) यांना सिव्हील हॉस्पीटल जळगाव येथे उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले.

फेकरी रेल्वे उड्डाण पुलावर भीषण अपघात
अटल करंडक एकांकिका स्पर्धेत मूळजी जेठा महाविद्यालय विजयी

मालट्रक चालक भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवल्याने सदर अपघात घडला असून यामुळे मानेकर यांचा मृत्यू झाला. दोन्ही वाहनांचे व वाहनांमधील मालाचे नुकसानीस हा ट्रक चालक कारणीभूत असून अपघातग्रस्तांना मदत न करता तो तेथून पसार झाला असल्याने त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मयताचे वडील व नातेवाईकांनी मागणी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com