शेतकऱ्यांना लागले मृग नक्षत्राच्या पावसाचे वेध

शेतकऱ्यांना लागले मृग नक्षत्राच्या पावसाचे वेध

गुढे.Gudhe ता.भडगांव (वार्ताहर)

यावर्षी ८ जूनलाच मृग नक्षत्राला (Mrig Nakshatra) प्रारंभ होत असून. ऋतू चक्रकाळानुसार सुर्य मृग नक्षत्रात दुपारी १२:३७ प्रवेश करत असून मृग नक्षत्रातील पहिल्या पावसाचे पहिल्या पंधरवाडयाचे (first fortnight of rain) पहिले वाहन गाढव (Donkey's first vehicle) आहे.हे वाहन समिश्र पावसाचे असते असे जुने जाणकार,अनुभवी शेतकरी (Farmers) सांगतात म्हणून या मृग पावसाची सर्वच शेतकऱ्यांना मोठी आशा असते म्हणून मृग नक्षत्राच्या पावसाचे वेध व प्रतिक्षा (Wait) लागली आहे.

संपूर्ण पावसाळा ऋतूत मृग नक्षत्राच्या पावसाची शेतकऱ्यांना(Farmers) खरी आस असते या नक्षत्रातील पाऊस शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार महत्वाचा मोती पोवळयाचा असतो.या पावसाची पेरणी व लागवड फार महत्वपूर्ण मानली जाते या नक्षत्रात पेरणी व लागवड (Sowing and planting) झाल्यास उगवण चांगली होते व ती निरोगी व पुढे हंगामात भरघोस उत्पन्न देणारी असते म्हणून शेतकऱ्यांना या मृगनक्षत्राच्या पावसाची (rain) मोठी आशा व प्रतिक्षा असते इतर नक्षत्रात उशिरा झालेली पेरणी व लागवड झाल्यास तीची उगवण चांगली असते व रोगराईमुक्त देखील असते व उत्पन्न देखील हमीचेअसते.

म्हणूनच या नक्षत्रात झालेला जोरदार पाऊस मागील चार महिन्यांंत कडक उन्हाने तप्त झालेली शेत जमीन उन्हाची मोठी झळ सोसून जमीन कोरडी व तहानलेली असते या तहानलेल्या जमीनीची मृग नक्षत्रात (Mrig Nakshatra) झालेला जोरदार पावसावरच तहान शमते म्हणून सर्वानाच या नक्षत्रातील पावसाची मोठी प्रतिक्षा व आशा असते मागील वर्षी सरासरी चांगला पाऊस समाधानकारक झाला आहे यावर्षी देखील असाच भरपूर पाऊस पडू दे पांडुरंगा अशी विनवणी केली जात आहे.

गेल्या आठवड्याभरापासून हंगामात झालेला बदल व अरबी समुद्रात कमी दाबाचा पटामुळे निसर्ग चक्रीवादळाची उत्पत्ती निर्माण झाली यामुळे काही ठिकाणी वादळी पावसाचा तडाखा बसला व काही ठिकाणी झळ बसली तर काही ठिकाणी बेमोसमी पाऊस झाला.व हवामानात झालेला बदल व पावसाचे संकेत व इशारा देखील देण्यात आला आहे.

मृग नक्षत्राच्या (Mrig Nakshatra) पावसा बाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहे यावर्षी पाऊस वेळेवर होणार असल्याचा अंदाज वर्तवला गेला यामुळे या बेमोसमी पावसावर पेरणी लागवड करू नका असे सुचविल्याने अनेकांनी भीती व्यक्त केली आहे.

यावर्षी रोहिणी नक्षत्रात (Rohini constellation) अनेक ठिकाणी बेमोसमी पावसाचा शिडकावा झाला आहे.शेतकऱ्यांना रोहिणी नक्षत्राचा पाऊस नको असतो कारण शेतकरी म्हणतात रोहिणी नक्षत्रात पावसाने अंडे गाळले तर पुढे मृग नक्षत्रात पाऊस येत नाही असा अंदाज व्यक्त करतात म्हणून आता शेतकऱ्यांना खऱ्याअर्थाने मृगाच्या पावसाचीच आस लागली आहे आणि तोच पाऊस शेतकऱ्यांना उपयुक्त व उपयोगी असतो.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com