गोड ऊसाची कडू कहाणी ; ऊसतोड होत नसल्याने शेतकरी हवालदिल

गोड ऊसाची कडू कहाणी ; ऊसतोड होत नसल्याने शेतकरी हवालदिल

यावल - प्रतिनिधी yaval

तालुक्यातील दहिगाव, कोरपावली, बोराडे, चुंचाळे, पाडळसे, कठोरा, कासवे, दुसखेडा परिसरातील अंदाजे अनेक एकर ऊसाची (Cane) तोड मुक्ताईनगर साखर कारखान्याकडून (Muktainagar Sugar Factory) होत नसल्याने तसेच 50 टक्के ऊस कोरडा खट्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

कोरपावली शिवारात अनेक शेतकऱ्यांनी तर चाऱ्यासाठी गवळी लोकांना उस मोफत देऊन टाकला हातचा घास गेल्याने (Farmers) शेतकरी हवालदिल झाला असून परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये शासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

तालुक्यातील (Faizpur) फ़ैजपुर येथील येथील मधुकर सहकारी साखर कारखाना (Madhukar Cooperative Sugar Factory) बंद पडल्याने तसेच या आधी पण यावल (Yaval) तालुक्यातील बराच ऊस मुक्ताईनगर साखर कारखान्याकडे नेला जात होता आणि आहे,ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळपासाठी मुक्ताईनगर येथील मुक्ताई सहकारी साखर कारखाना येथे नोंदणी केला आहे.

एप्रिल महिन्याची दहा तारीख आल्यावर सुद्धा मुक्ताई सहकारी साखर कारखान्याकडून उसाची तोडणी होत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.ऊस तोडणीसाठी शेतकर्‍यांनी अनेक वेळा मुक्ताईनगरची वारी केली परंतु पदरी निराशा येत असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जगावे की मरावे? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे ऊस तोड करणाऱ्या टोळ्यांना वरतून पैसे कबूल करूनही ऊस तोड होत नाही ऊस लागवड करा म्हणून मुक्ताई साखर कारखान्याचे कर्मचारी व पदाधिकारी गावागावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना ऊस लागवड करण्याची विनंती करतात आता मात्र ऊस तोडणीसाठी कोणी फिरकून सुद्धा बघत नाही प्रचंड उन्हामुळे शेतकऱ्यांनी रात्र आणि दिवस डोळ्यात तेल घालून ऊस उत्पादनासाठी साठी घेतलेली मेहनत वाया जाणार की काय? या काळजीने शेतकरी व त्याचा परिवार कासावीस होत आहे

आतातरी मुक्ताईनगर साखर कारखाने शेतकऱ्यांचा अंत न पाहता ताबडतोब उसाची तोडणी करावी अशी मागणी परिसरातील शेतकरी बांधव देत आहे.

Related Stories

No stories found.