बैलगाडीवर विद्युत तार पडल्याने शेतकऱ्याचा बैलांसह मृत्यू

बैलगाडीवर विद्युत तार पडल्याने शेतकऱ्याचा बैलांसह मृत्यू

फैजपूर Faizpur ( प्रतिनिधी)

बैलगाडीत बसून शेतकरी (farmer) त्याच्या शेतात (field) जात असताना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची (Maharashtra State Electricity Distribution Company) इलेक्ट्रिक खांबावरील विद्युत प्रवाह (electric current) सुरू असलेली तार (wire falls) बैलगाडीवर (bullock cart) पडल्याने शेतकरी (farmer) यशवंत कामा महाजन (वय ६३) राहणार, चिखली बुद्रुक व त्यांचा बैल मृत्युमुखी (bull died) पडल्याची घटना १ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेच्या दरम्यान घडली.

याबाबत फैजपूर पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चिखली बुद्रुक येथील शेतकरी यशवंत कामा महाजन (वय ६३) हा शेतकरी शेतात बैलगाडी घेऊन जात असताना बैलगाडीवर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची इलेक्ट्रिक खांबावरील विद्युत प्रवाह सुरू असलेली विद्युत तार अचानक बैलगाडीवर पडल्याने बैलगाडीवर असलेला शेतकरी यशवंत कामा महाजन यास शॉक लागून मयत झाला. तर ४०,००० रुपये किमतीचा बैल ही मृत्युमुखी पडला.

घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी राजोरा येथील अधिकारी व कर्मचारी यांना फोन करून त्यांनी विद्युत प्रवाह बंद केला.

एपीआय सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय एम .जे .शेख, ए एस आय हेमत सांगळे ,पोलीस नाईक विकास सोनवणे ,गुलबक्ष तडवी यांनी घटनास्थळी फैजपूर येथील पशु वैद्यकीय अधिकारी इंगळे यांना घेऊन त्यांनी मयत बैलाचे शवविच्छेदन केले तर मयत यशवंत महाजन यांचे शवविच्छेद यावल येतील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.

फैजपूर पोलीस स्टेशनला मुरलीधर महाजन चिखली खुर्द यांनी फैजपूर पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून फैजपूर पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हे. कॉ. उमेश सानप करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com