
जळगाव jalgaon
कर्जाला कंटाळून (Tired of debt) दीपक जनार्दन सस्ते (वय- ३२, रा. जरंडी ता. सोयगाव) यांनी पिकांवर (crops) फवारणीचे औषध (Spraying medicine) प्राशन करून आत्महत्या (suicide) केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.
सोयगाव तालुक्यातील जरंडी येथे दीपक सस्ते हा तरुण वास्तव्यास असून हातमजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. गुरुवारी दुपारच्या सुमारास कर्जबाजाराला कंटाळून दीपक ने फवारणीची आवश्यक प्रसार करून आत्महत्या केल्याची घटना घडली. घटनेतील माहिती मिळताच त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्याने त्यांची तपासणी करीत मयत घोषित केले. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे त्यांच्या पश्चातत पत्नी स्वाती, मुलगा पियुष, मुलगी प्रांजल असा परिवार आहे.